भाजपचे नेते, माजी नगरसेवक भारत साबदे, भाजप पदाधिकारी गौस शेख, ॲड. गणेश
कांबळे, अविराजे निंबाळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये
केला जाहीर प्रवेश
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख
उपस्थितीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे
अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. ८
नोव्हेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील गंजगोलाई येथील लोकशाहीर आण्णा
भाऊ साठे पुतळ्या नजीक महाविकास आघाडीची प्रचार सभा संपन्न झाली. या
सभेत भाजपचे नेते माजी नगरसेवक भारत साबदे, भाजप पदाधिकारी गौस शेख, ॲड.
गणेश कांबळे, अविराजे निंबाळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास
आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या
नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नेत्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी
शुभेच्छा दिल्या.
