केंद्र, राज्य सरकारच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे मुरुडवासीयांना आवाहन, संवाद बैठकीस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद
लातूर / प्रतिनिधी –
विधानसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. राहुल गांधी, शरदचंद्रजी पवार, उध्दव ठाकरे यांना न्याय देण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने महाराष्ट्राला न्याय द्यावा. केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका. आता खऱ्या अर्थाने केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांना जनतेने ओळखले आहे. न्याय देण्याची वेळ आलेली आहे, असे मत आमदार धिरज विलासराव देशमुख केले.मुरुड शहरातील दत्तनगर, चव्हाणवाडी, शिवाजीनगर, मार्केट यार्ड, नरसिंह चौक, मोदी नगर, पारुनगर, अभय कलेक्शन व गुंफावाडी या ठिकाणी आयोजित संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते.
या संवाद बैठकीस माजी मंत्री सहकार महर्षी दिलीप देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार अॅड. त्रिंबक भिसे, दिलीप नाडे, आबासाहेब पाटील, जगदीश बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन काळे, धनंजय देशमुख, श्याम भोसले, सुभाष घोडके, अनुप शेळके, दिगंबर पाटील, बी. एन. डोंगरे, रवींद्र काळे, अमर मोरे, डॉ. दिनेश नवगिरे, अभयसिंह नाडे, बख्तावर बागवान, वैजनाथ नाडे, राजेंद्र मस्के आदी मान्यवर उपस्थित होते आमदार देशमुख म्हणाले की, मुरुड हे वेगाने वाढणारे शहर आहे. मुरुड शहरावर लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांनी नेहमी प्रेम केले आहे. अनेक प्रश्न सोडवण्याचे आम्ही काम केले आहे. शहराच्या विकासासाठी साधारणपणे ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुरुड शहरामध्ये अनेक जाती धर्माची माणसे एकसंघ भावनेने राहतात. या सर्वांना एकसंघ ठेऊन विकासाचे भागीदार त्यांना बनवायला पाहिजे. आपल्या मताधिक्यामुळे आमची ताकद वाढणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांना जनताच न्याय देणार आहे. आता महाराष्ट्राला न्याय देण्याची ताकद आपल्या मतामध्ये आहे. आपल्या हाताने हाताचे बटन दाबून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तुम्ही निवडून द्या सेवेची हमी मी देतो- दिलीपराव देशमुख
महाराष्ट्रात असलेले सरकार घटनाबाह्य आहे. सत्तेमध्ये लबाड लोकं बसलेली आहेत. महाराष्ट्र हा शाहू, फुले, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मंत्री, आमदार पळवले जात आहेत. यासाठी हे सरकार बदलावे लागेल. तुम्ही आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा संधी द्या. विकासाची आणि आपल्या सेवेची हमी मी देतो, असा शब्द माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मुरुड शहरवासीयांना दिला.
काँग्रेस नुसते बोलत नाही करून दाखवते. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळामध्ये मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या काळामध्ये गरीब, निराधार यांच्यासाठी संजय गांधी, श्रावणबाळ घरकुल योजना त्या सुरू केली. काँग्रेस म्हणजे सर्वधर्म समभाव आहे. आमचे सरकार लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत शिवाजीराव नाडे यांच्या कार्याला सलाम
आदरणीय दिवंगत शिवाजीराव नाडे साहेबांमुळे मुरुडची ओळख आहे. दिवंगत शिवाजीराव नाडे साहेबांमुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाव कमावले आहे. बँकेची सात मजली इमारत त्यांनी उभी केली आहे. तालुक्यात टेलिफोनचे जाळे, कृषी पंपासाठी विद्युत पुरवठाही कामे दिवंगत शिवाजीराव नाडे यांनी केली असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.
भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह मुरुडमध्ये बांधू
मुरुड आणि परिसरात भटक्या-विमुक्त जाती जमातीचे लोक राहत आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मुरुडकरांनी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. आम्ही त्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधून देऊ असा शब्दही दिलीपराव देशमुख यांनी याप्रसंगी दिला.
मतदान करताना विलासराव देशमुख यांचा चेहरा दिसला पाहिजे
पराभवाच्या धास्तीने महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. काँग्रेस पक्षाने यापूर्वीच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. मुरुडचा जो विकास झाला त्याचे पूर्ण श्रेय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांना जाते, असे दिलीपराव नाडे यांनी सांगितले. मतदान करताना आपणास विलासराव देशमुख साहेबांचा चेहरा दिसला पाहिजे, असे भावनिक आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
या संवाद बैठकीस दीपक पठाडे, व्यंकट सुरवसे, शिवसेनेचे बी एन डोंगरे, विष्णू घुटे, राजेंद्र मस्के, उद्धव सवासे, भारत लाड, ईश्वरचंद्र चांडक, महेश भोसले, आकाश कणसे, जोडगे गुरुजी, मुमरे गुरुजी आदींसह काँग्रेस-महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
