• Wed. Apr 30th, 2025

निवडणूक खर्च तपासणीसाठी अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

Byjantaadmin

Nov 10, 2024

निवडणूक खर्च तपासणीसाठी अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

  • निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांच्याकडून खर्चाची तपासणी

लातूर, दि. ९ : निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणूक खर्चाच्या पहिल्या तपासणीला अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजाविल्या आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघातील ५ आणि निलंगा मतदारसंघातील ८ उमेदवारांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. गुर्जर यांच्या उपस्थितीत उदगीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी ७ नोव्हेंबर रोजी उदगीर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मतदारसंघातील १३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी निवडणूक खर्च लेखे तपासणीसाठी सादर केले. यावेळी ५ उमेदवार गैरहजर होते.

तसेच निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ८ नोव्हेंबर रोजी निलंगा येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात झाली. यावेळी १३ पैकी ५ उमेदवार उपस्थित राहिले. तसेच ८ उमेदवार गैरहजर होते. सर्व गैरहजर उमेदवारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७(१) नुसार संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावून ४८ तासाच्या आत लेखी उत्तर देण्याबाबत कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed