अमित देशमुख करणार महाराष्ट्राचे नेतृत्व,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे सूचक विधान
महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन,
लातूरच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध
असल्याची आमदार अमित देशमुख यांची ग्वाही
लातूर (प्रतिनीधी) : शुक्रवार दि. ८ नोव्हेबर २४
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार
लातूरचे सुपुत्र माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे
महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत या नेतृत्वाला इथेच रोखण्यासाठी भाजपने
आखलेलं मत विभाजनाचे षडयंत्र उधळून लावा, लाखोंच्या मताधिक्याने विजयी
करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले
यांनी आज लातूर येथील अण्णा भाऊ साठे चौकात आयोजित महाविकास आघाडीच्या
विशाल जाहीर सभेत बोलताना केले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी प्रदेश काँग्रेसचे
अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची लातूर येथील अण्णा भाऊ साठे चौकात प्रचंड
विशाल जाहीर सभा झाली. या सभेत उपस्थित नानाभाऊ पटोले व मान्यवरांचे
लातूरकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना अमित विलासराव
देशमुख यांनी येथील जनतेने आजवर दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करून,
पुढील कार्यकाळासाठी आशीर्वाद मागितले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे
काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी
काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार वजाहत मिर्झा,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजा मणियार, मोईज शेख, माजी
महापौर विक्रम गोजमगुंडे, अॅड. किरण जाधव, सुनील बसपुरे, विक्रांत
गोजमगुंडे, दिपक सूळ, वैजनाथ शिंदे, उदय गवारे, श्रीशैल उटगे, माजी आमदार
रामहरी रुपनवर, अशोक गोविंदपूरकर, कैलास कांबळे, जगदीश बावणे, मविआचे
सर्व नेते-पदाधिकारी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख
साहेबांनी जोपसलेला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे
नेण्याचे काम केले आहे. विलासराव देशमुख यांनी सर्वधर्म समभाव हा विचार
घेऊन राजकारण केले. मात्र भाजपकडून समभाव विचारांना संपवण्याचे काम केले
जात आहे. अमित देशमुख यांना रोखण्यासाठी मतविभाजनाची खेळी भाजपा खेळत
आहे. त्यासाठी त्यांनी अनेक उमेदवार उभे केले आहेत. मात्र अमित देशमुख हे
महाराष्ट्र राज्याचे होणारे नेतृत्व आहेत. त्या नेतृत्वाला संपवण्याचे
काम भाजप करत आहे. त्यामुळे मत विभाजन होऊ देणार नाही, असे वचन देण्याचे
आवाहन पटोले यांनी यावेळी केले.
भाजपामुळे मागील साडेसात वर्षात लातूरसह महाराष्ट्र राज्याच्या विकासात
खोडा घातला असल्याची टीकाही पटोले यांनी केली. मात्र पुढील काळात
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
आमचे सरकार सत्तेत येताच आम्ही पंचसूत्री कार्यक्रम राबवून समाजातील सर्व
घटकांना न्याय देणार असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना अमित विलासराव देशमुख म्हणाले, लातूरमध्ये आजवर जो काही
विकास झाला आहे तो फक्त काँग्रेस पक्षाने आणि या पक्षाच्या नेत्यांनी
केला आहे, महायुतीच्या नेत्यांनी येथे येऊन आश्वासने दिली परंतु त्यापैकी
एकाही आश्वासनाची कधीही पूर्तता झाली नाही असे सांगीतले
महायुतीचे सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत
आल्यापासून लातूरचा विकास खुंटला आहे
महायुतीचे सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यापासून लातूरचा विकास
खुंटला आहे, एवढेच नाही तर भ्रष्टाचार गुंडगिरी, अवैध धंदे वाढले आहेत,
हे चित्र बदलण्यासाठी आपणाला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे आहे,
त्यासाठी मला आपले आशीर्वाद हवे आहेत. काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी
लातूरचे नेतृत्व केले असल्यामुळे, हे शहर दार नसलेले घर बनले आहे, येथील
प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे, माझ्या पूर्वीचे नेते आणि मी कायम
पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे असे सांगीतले..
सामाजिक सलोखा टिकून राहील
यासाठी सातत्याने प्रयत्न केले
पूढे बोलतांना ते म्हणाले, लातूरची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील,
येथील सामाजिक सलोखा टिकून राहील यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत,
अलीकडच्या काळात मात्र समाजा समाजात भांडणे लागावीत, शांतता निर्माण
व्हावी यासाठी प्रयत्न झाले आहेत, ते प्रयत्न आपण हाणून पाडले आहेत,
भविष्यात असे धाडस करू नये यासाठी आपण त्यांचा बंदोबस्त करावयाचा आहे,
लातूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रत महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य
करू नये यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येताच कठोर शिक्षेची तरतूद असलेला
कायदा करण्यात येईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली,
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत एकजूट दाखवून
पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्न करावेत
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवून माझ्या विजयासाठी
प्रयत्न करावेत अशी विनंती करून काँग्रेस आणि घटक पक्षातील सर्व पदाधिका
कार्यकर्त्यांचा कायमपणाने सन्मान राखला जाईल अशी ग्वाही यावेळी दिली
महिलांना मोफत प्रवास देणारी
लातूर पहिली महापालिका
राहुल गांधी यांनी आपल्या राज्याला पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे.
काँग्रेस गॅरंटी कार्ड, महिलांना महिन्याला ३ हजार रुपये देणार आहे.
देशात महिलांना मोफत बस प्रवास देणारी लातूर ही पहिली महापालिका
असल्याचे त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले. संपूर्ण भारतात लातूरसारखा
देखणा शादीखाना शोधूनही सापडणार नाही. जातीय सलोखा राखण्याचे काम
महाविकास आघाडीने केला. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही
लढाई महाविकास आघाडी लढतेय आणि या लढाईचे नेतृत्त्व नाना पटोले हे करत
आहेत, असेही ते म्हणाले.
लक्षवेधक
जातीनिहाय जनगणना करणार
मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजना
लातूरसाठी सोयाबीन केंद्र सुरु करणार
शेतकऱ्यांना १४ तास वीज पुरवठा करणार
शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे स्मारक उभारणार
