देवघराच्या सन्मानासाठी महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकरांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे काम करू – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-लातूर शहर व ग्रामीण मतदार संघातून अजित विधानसभेसाठी इच्छुक होते. त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे देशमुखांनी भकास केलेल्या लातूर शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सन्माननीय चाकूरकर साहेब व राज्याचे माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेब, मा.ना.नरेंद्र मोदीजी, मा.प्रमोदजी महाजन यांना आदर्श मानतो. राजकीय स्वार्थासाठी काही लोक देवघरातील देव आमच्यासोबत असे भूमिका मांडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, परंतु खर्या अर्थाने देव आणि घरही आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे देवघराच्या सन्मानासाठी महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकरांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहू असे आवाहन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कैलास निवास मजगे नगर येथे आयोजित भाजपा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, मौलाना फिरोज पटेल, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी आ.माणिकराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, लालासाहेब देशमुख, डॉ.मन्मथअप्पा भातांब्रे, दिग्विजय काथवटे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रागिणीताई यादव, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, अॅड.गणेश गोजमगुंडे, भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, बाबासाहेब कोरे, ज्योतीराम चिवडे,रविशंकर लवटे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, 1980 ते 2024 या चाळीस वर्षाच्या कालावधीत साडेआठ वर्ष मुख्यमंत्री व अनेक वर्ष मंत्री पदावर काम करूनही लातूरचा कुठलाही विकास देशमुखांनी केलेला नाही. लातूर शहर नावाजलेले असतानाही लातूरमध्ये एकही उद्योग आणण्याचे काम देशमुखांनी केलेले नाही. पंरतु भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लातूर शहरातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी रेल्वे बोगी कारखाना आणण्याचे काम केलेले आहे असेही माजी आ.कव्हेकर यांनी सांगितले. यावेळी भाजपा, भाजपा युवा मोर्चा, विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काँग्रेस पक्षाला संपविण्याचे काम देशमुखांनी केले
मा.शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना पाडण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. बस्वराज पाटील यांना पक्ष विरोधी काम करून पाडले. विलासराव देशमुख हयात असताना वैजनाथ शिंदे यांच्या विरोधात दिलीपरावांनी प्रचार केला. सौ.प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी जिल्हा परिषद देशात पहिली आणली. त्यांना विरोधी प्रचार करून देशमुखांनी पाडले. त्यामुळे यांची प्रामाणिकता पक्षाबरोबर नाही. काँग्रेस निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंड करून बेईमान देशमुखांना पाडावे असे आवाहन माजी आ.कव्हेकर यांनी केले.
चाकूरकर कुटुंबियाचा राजकीय अस्त घालण्याचा घाट विरोधकांनी केला
– डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर शहर विधानसभेसाठी आम्ही चौघेही इच्छुक असताना पक्षाने विचार करून माझी उमेदवारी निश्चित केली. अजित भैय्यांनी एवढे चांगले काम केले असतानाही त्यांना थांबावे लागले. याबद्दल त्यांची माफी मागते. आजचे खरे उत्सवमूर्ती तेच आहेत. पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून पुन्हा आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. लातूर शहराची उमेदवारी 2009 मध्ये काँगे्रसकडून निश्चित झाली होती. परंतु मतदार संघ निश्चित नसल्यामुळे चाकूरकर घराण्याचा राजकीय अस्त करण्याचा घाट लातूरातील सत्ताधातील विरोधकाकडून करण्यात आला होता. त्यानंतर 2017 पासून भाजपाच्या संपर्कात आले आणि लातूर शहर विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळाली. आताही उदगीर येथील हॉस्पिटलचा विषय घेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. 1994 मध्ये माझे लग्न झाले आणि त्यानंतर 1995 ला कव्हेकर साहेबांना आमदारकी मिळाली. परंतु तेव्हापासून राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. चार महिण्यापूर्वी कव्हेकर परिवारावरही किरकोळ घटनेतून गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांच्या या संघर्षाचा आदर्श समोर ठेवून माझीही वाटचाल सुरू आहे. पक्षश्रेष्ठी यांच्या सहकार्यातून व लातूर शहर भाजपाच्या समन्वयातून आपली वाटचाल सुरू आहे. या वाटचालीला सर्वांचे आशीर्वाद पाठीशी राहिले तर माझी ही राजकीय वाट सुकर होईल असा विश्वासही डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
23 नोव्हेंबरला लातूर भाजपाचा ऐतिहासिक विजय घडवून आणू – अजित पाटील कव्हेकर
गेल्या साडेआठ वर्षापासून भाजपा पक्षवाढीसाठी व जनतेच्या हितासाठी अनेक कामे केली. कचर्यासाठी 72 तास अन्नत्याग आंदोलन, पिवळ्या पाण्यासाठीचे आंदोलन, रस्ते नाल्या व शेतकर्यांच्या प्रश्नासाठीचे आंदोलन असे अनेक आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. त्याच कामाच्या बळावर 2047 मध्ये विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मोठ्या जोमाने काम करावयाचे आहे. मधल्या कालावधीत डॉ. अर्चनाताईच्या हॉस्पिटला विषय असो की आपल्या शाळेचा विषय असो यावर राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केलेले आहे. त्यामुळे या विरोधकांना विकासाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्याचे काम आपण या प्रचाराच्या माध्यमातून करणार आहोत. केंद्राने व राज्याचे केलेल्या विकासासाठी मुद्यावर लातूरमध्ये अबकी बार चाकूरकर सरकार आणण्याचा संकल्प भाजपा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून या माध्यमातून 23 नोव्हेेंबरला लातूर भाजपाचा ऐतिहासिक विजय घडवून आणू असा संकल्पही भाजपा युमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
————————————————–