जनसंपर्क अभियाना अंतर्गत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेच्या माध्यमातून संचालीका अदिती अमित देशमुख यांची हणमंतवाडी येथे गावभेट, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
लातूर (प्रतिनीधी) : जनसंपर्क अभियाना अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. ६ नोव्हेंबर २४ रोजी सांयकाळी ५ वाजता टवेन्टिवन ॲग्री ली.च्या संचालीका अदिती अमित देशमुख यांनी हणमंतवाडी येथे पदयात्रा काढून, ग्रामस्थाशी संवाद साधला.
यावेळी हणमंतवाडी गावात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन नागरीकांच्या भेटी घेतल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन, त्यांना विजयी करावे असे
आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर मतदार संघात गेल्या पाच वर्षात हणमंतवाडी येथे ३ कोटींच्या केलेल्या विकासकामांची माहिती दिली़. गा्रमस्थांनी पदयात्रेच्या दरम्यान विकासकामा संदर्भात समाधान व्यक्त केले. पदयात्रेतग्रामस्थ व काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
