• Wed. Apr 30th, 2025

संधीचे सोने करा आणि आणि आपली लाडकी बहीण डॉ. अर्चनाताई पाटील यांना निवडून द्या –  कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे आवाहन

Byjantaadmin

Nov 7, 2024

संधीचे सोने करा आणि आणि आपली लाडकी बहीण डॉ. अर्चनाताई पाटील यांना निवडून द्या –  कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे आवाहन
 लातूर /प्रतिनिधी : भाजपा महायुतीच्या सरकारने समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबवले आहेत. या योजनेची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून  आर्थिक सक्षम करण्याचे काम करण्यात आले. आता सर्व मतदारांनी माहितीच्या अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांची लाडकी बहीण डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना खंबीर साथ देऊन निवडून आणावे असे आव्हान कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

लातूर शहर मतदार संघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या प्रचारा निमित्त गंगापूर येथे  बुधवार (दि. 7) रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

 यावेळी व्यासपीठावर माहितीच्या अधिकृत उमेदवार डॉ.  अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख ऍड. बळवंत जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दाणे, गंगापूरचे माजी सरपंच बाबू खंदाडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष रागिणीताई यादव, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत,  ऍड. गणेश गोमसाळे, लालासाहेब देशमुख, माणिकराव आलुरे, पृथ्वीसिंग बायस,  भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल पतंगे,  संघाचे चेअरमन शिवसिंह सिसोदिया मीनाताई गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षपाशा पटेल म्हणाले की, महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेऊन जात आहे, विकासाचा हा  परत राज्यात माहिती सरकार येणे आवश्यक आहे असे सांगून, त्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना मतदानाचे भरभरून दान लाडक्या बहिणींनी द्यावे असे आवाहन केले.
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी आमदारांच्या नाकर्तेपणावर जाहीर टीका करून लातूरला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर भाजपा, महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.  शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांनी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनाहाताने विजयी करावे. ऍड. बळवंत जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की  तुमच्या संपर्कात जो उमेदवार राहणार आहे त्याच उमेदवाराला मतदारांनीआपल्या मताचे बहुमूल्य दान द्यावे. रागिणी ताई यादव यांनीबोलताना सांगितले की, आपली लाडकी बहीण अर्चनाताईया उच्चशिक्षित, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आहेत. महिलांना सर्व दृष्टीने सक्षम करणे हेच त्यांचे प्रमुख लक्ष आहे. त्यांचे हात मजबूत करून माहिती सरकारला परत राज्यात निवडून देण्याचे आवाहन रागिनीताई यादव यांनी केले.
 प्रचाराच्या जाहीर प्रचार सभेचे प्रस्ताविक करताना माजी सरपंच बाबू खंदारे यांनी सांगितले की,  मी सरपंच असताना गंगापूर मध्ये विकास निधी खेचून आणला तेवढा निधीही लातूरच्या आमदाराला  पंधरा वर्षाच्या कार्यकाळात लातूरला विकास निधी आणता आला नाही.  आम्ही आलेल्या नदीचे बॅनर लावून जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे करत आहेत. यामुळे नागरिकांनी आता महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनाच बहुमताने निवडून देऊन शाश्वत विकासाला आपला पाठिंबा द्यावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.


 जनतेचा हरवलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी –  डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
गंगापूरकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार
 मतदार हा राजा आहे, लोकशाहीमध्ये मतदार हा कायमस्वरूपी राजाच असावा असे अपेक्षित असताना, लातूर शहर मतदार संघात मतदार याचिकाच्या भूमिकेत दिसतो हे चित्र बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचे आहेत.
 गंगापूर गावात काढण्यात आलेल्या पद यात्रेमध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गंगापूरकरांनी दाखवलेल्या प्रेमाची उतराई होणे अशक्य आहे. आपल्या ऋणात राहूनच समाजातील प्रत्येक स्तरातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्य करणार आहे असा शब्द डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी दिला. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता  डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी केले.

 प्रारंभी गंगापूर येथील श्री हनुमान मंदिरात महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी श्री हनुमानाचीं मनोभावे पुजा व आरती करून आशीर्वाद घेतले. गंगापूरकरांच्या प्रचंड उत्साहात पदयात्रा काढून प्रत्येक गावकऱ्यांना घरोघरी जाऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधून महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून कमळाच्या चिन्हावर मतदान करून विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे आव्हान केले. पदयात्री दरम्यान गावातील महिलांनी ठीक ठिकाणी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे औक्षण केले. पदयात्रेत फटाक्यांचे आतिषबाजी  आणि अर्चनाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच चर्चा, पाटील अर्चना. भाजपा माहितीचा विजय असो घोषणांनी गंगापूर गाव दणाणून सोडले.  गावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माहितीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजय त्यांचाच असल्याचे दाखवून दिले.पदयात्रेनंतर झालेल्या जाहीर सभेस माहितीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि गंगापूर व परिसरातील नागरिक संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed