• Wed. Apr 30th, 2025

पानगाव, रेणापूर, शिवली, टाका येथील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश लातूर ग्रामीण मध्ये धिरज देशमुख यांना वाढता पाठिंबा

Byjantaadmin

Nov 6, 2024

पानगाव, रेणापूर, शिवली, टाका येथील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश लातूर ग्रामीण मध्ये धिरज देशमुख यांना वाढता पाठिंबा

लातूर/ प्रतिनिधी-विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तत्पूर्वी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पानगाव, रेणापूर, शिवली व टाका येथील युवक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची या भागातील ताकद आणखी वाढली आहे.

रेणापूर येथील सचिन मोटेगावकर, नितीन मोटेगावकर, पानगाव येथील मनसेचे पदाधिकारी शेख गौस सलीम, भाजपचे संतोष तुरूप, बिटरगाव येथील सोसायटीचे सदस्य गोपाळ पंढरीनाथ जगताप, मसला येथील भाजपचे शांतलिंग मच्छिंद्र बिडवे यांच्यासह शिवली (ता. औसा) येथील आकाश यादव, अक्षय भोसले, रंगनाथ आळणे, सुनील वाले, शिवरूद्र वाले, ऋषीकेश जाधव, मनोज आळणे, सौरभ यादव, महेश मोहिते, टाका येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गिरीश भोई, प्रवीण भोई, अमर गायकवाड, सोमनाथ मोरे, किरण कांबळे, बालाजी मोरे, जीवन भोई, विकास मोरे यांनी काँग्रेसच्या विचारांवर प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, धिरज विलासराव देशमुख, विक्रांत गोजमगुंडे, मोईज शेख, सर्जेराव मोरे, किरण जाधव, समद पटेल, अशोक गोविंदपूरकर, विजय देशमुख, प्रदीप राठोड, राम स्वामी, रघुनाथ शिंदे, अजित काळदाते, आश्विन स्वामी, तानाजी पाटील, शिवप्रसाद शिंदे, सचिन शिंदे, संतोष मेंढेकर, महेबूब तांबोळी, आबा शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *