अभय साळुकेंच्या विजयासाठी तरुणाई सरसावली;निलंगा मतदारसंघात काँग्रेसकडे तरुणांचा वाढता प्रतिसाद
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या विजयासाठी तरुणाई पुढे सरसावली असून मागच्या दोन दिवसात मतदारसंघातील शेकडो तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत अभय साळुंके यांचे हात बळकट करत काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले.
निलंगा विधानसभेचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके हे कार्यकर्तृत्व व आक्रमक चेहरा म्हणून मागच्या २५ वर्षापासून निलंगा विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत. शिवसेना व मनसेमध्ये असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात तरुणांचे संघटन करुन त्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याचे काम केल्याने तरुणाईमध्ये त्यांच्या बाबतीत मोठे आकर्षण आहे. काँग्रेस हावयस्कर लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जात असत. मात्र निलंगा मतदारसंघात काँग्रेसकडे तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहता काँग्रेस मध्येही तरुणांची मोठी ताकद उभी राहून त्यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात बदल घडवून अभय साळुंके यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
मागच्या दोन दिवसात कळमगाव येथील सरपंच धोंडीराम शिंदे यांच्या पुढाकारातून रमाकांत मोरडे, सुभाष शिंदे, तुळशीराम वाघमोडे, अजित गरिबी, प्रतीक शिंदे, कृष्णा शिंदे, प्रशांत शिंदे, कृष्णा साळुंखे, ओमकार काळे, रामेश्वर काळे, महेश शिंदे, किशोर शिंदे, राम शिंदे, सुनील शिंदे, अभिजीत गरिबी, आकाश हरिलाशे, विष्णु शिंदे, गंगाधर अजय, ढोबळे किरण, काळे परिहार वाघमोडरे तुषार मोरडे, माधव वाघमोडे, सचिन शिंदे, भरत किसन शिंदे, गजानन शिंदे, कृष्णा शिंदे, कन्हैया गायकवाड, जनक शिंदे, शिवाजी शिंदे, भोसलेवाडी, शिवणी कोतल येथील ज्ञानेश्वर ढोले, सुरज शिंदे, बालाजी खाडगावे, मारुती मोहले, अंकुश शिंदे, धीरज शिंदे, लासोना येथील अशिष मोरे, आकाश माने, नितीन माने, महेश मुरके, अनिल टिळेकर, नंदकुमार माने, उध्दव माने, राम हुलसुरे, मारोती फुलारी, एकनाथ माने, मारोती टेकाळे, बालाजी पाटील, महेश माने, गुंडाजी मोरे, डॉ वाघंबर कानगुडे, अभिजित माने, ज्ञानेश्वर गाजरे, अतिष संगमे, विष्णू इंचूरे, गणेश फावडे आदींसह शेकडो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महायुती सरकारबद्दल आपला रोष व्यक्त करीत काँग्रेसचा विचार स्वीकारला.
