जनसंपर्क अभियाना अंतर्गत काँग्रेसची प्रचारात आघाडी महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेच्या माध्यमातून गावभेट, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे, चेअरमन वैशालीताई़़ देशमुख व अदिती अमित देशमुख यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद
लातूर (प्रतिनीधी) : मंगळवार दि. ५ नोव्हेबर २४
जनसंपर्क अभियाना अंतर्गत लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा
काळगे यांनी वरवंटी येथे, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन
वैशालीताई विलासराव देशमुख यांनी पेठ येथे तर टवेन्टिवन शुगर्स ली.च्या
संचालीका अदिती अमित देशमुख यांनी वसंतनगरतांडा येथे पदयात्रा काढून
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. ५
नोव्हेंबर २४ रोजी सांयकाळी ५ वाजता ग्रामस्थाशी संवाद साधला.
यावेळी गावात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन नागरीकांच्या भेटी घेतल्या. या
निवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन, त्यांना विजयी करावे असे आवाहन
करण्यात आले.
लातूर तालुक्यातील पेठ येथे मंगळवारी सायंकाळी श्रीमती वैशालीताई देशमुख
यांची पदयात्रा व महिला संवाद बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते़, यावेळी
त्यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर मतदार
संघात केलेल्या कामाची माहिती दिली़.
गेल्या पाच वर्षात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी आमदार म्हणून
वरवंटी येथे १२ कोटी १७ लाख, पेठ येथे ३ कोटी २ लाख तर महापूर
(वसंतनगरतांडा) येथे ६ कोटी पेक्षा अधिकची कामे केली आहेत. यामुळे
गा्रमस्थांनी पदयात्रेच्या दरम्यान विकासकामा संदर्भात समाधान व्यक्त
केले. यावेळी सुनीताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, जुबेदाबी शेख, सावित्रीबाई
लाळे, सुमनबाई सूर्यवंशी, आशाबाई सूर्यवंशी, कलावती सूर्यवंशी, कालींदा
साळुंके, लक्ष्मीबाई साळुंके, शीलाताई सूर्यवंशी, सरस्वती पांडवळे,
चंद्रकला वाडकर, शालुबाई पाटील, कौशाबाई नरवाडे, सुधामती गिरी, छायाबाई
करवंजे यासह आदी महिला व गावातील मंडळी व काँग्रेस महाविकास आघाडीचे
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अदिती अमित देशमुख यांनी पारंपरीक पोशाख परीधान करुन
बंजारा समाजाशी साधला संवाद
टवेन्टिवन शुगर्स ली.च्या संचालीका अदिती अमित देशमुख यांनी वसंतनगरतांडा
येथे पदयात्रा काढून तेथील नागरीकांशी, महीलांशी संवाद साधला. उषा राठोड
यांनी त्यांना पारंपरीक बंजारा समाजाचा पोशाख भेट दिला. हा पारंपरीक
पोशाख परीधान करुन त्यांनी महीला – भगीनींशी संवाद सांधला. बंजारा
समाजाच्या महीलांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले.
