डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पेठ ग्रामस्थांकडून ताईंचे जंगी स्वागत
ठिकठिकाणी औक्षण; महिलांनी भरली ओटी
लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस पेठ येथील ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.गावात ताईंचे जंगी स्वागत करण्यात आले.घरोघर महिलांनी त्यांचे औक्षण करत खणा-नारळांनी ओटीही भरली.डॉ.पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.४)सायंकाळी पेठ येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील यांच्यासह भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रागिनीताई यादव,शोभा कोंडेकर,मीनाताई गायकवाड, संगीत रंदाळे, सुनिल मलवाड,ॲड.दिग्विजय काथवटे, लालासाहेब देशमुख, पृथ्वीसिंह बायस,गंगापुरचे माजी सरपंच बाबुराव खंदाडे,ओम धरणे,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने,पेठचे शशिकांत धरणे,महेश पानढवळे, आणि पदाधिकाऱ्यांची ताईंसमवेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुख्य रस्त्यापासून गावात निघालेल्या या पदयात्रेत हलगीच्या निनादात घोषणा देणारे शेकडो नागरिक व तरुण सहभागी झाले होते. सायंकाळच्या अंधारात मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात ही पदयात्रा निघाली.गावातील जवळपास प्रत्येक घरी ताईंचे स्वागत व सत्कार करण्यात आला.घरोघर महिलांनी हळदी-कुंकू लावून पुष्पहार घालत त्यांचे औक्षण केले. महिलांनी खणा-नारळाने त्यांची ओटी भरली.
ताईंच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले.गावातील अनेकांनी आज प्रथमच भाजपाचा गमजा खांद्यावर घेतल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. गावातील विविध समाजांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देत, मंदिरात दर्शन घेत ताईंनी आशीर्वाद घेतला. गावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
महिलांची लक्षणीय उपस्थिती….
ताईंच्या पदयात्रेत पेठ येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रत्येक घरातील महिला पदयात्रेत सहभागी झाली असल्याचे दिसून आले. गावातील तरुणींनी भेट घेत ताईंचे पुष्पहार घालून स्वागत केले. ताईंनी त्यांची चौकशी करून शिक्षण नोकरी यासंदर्भात माहिती घेतली
रुग्णांची विचारपूस…
पदयात्रे दरम्यान अनेक ठिकाणी ताईंना घरात येत स्वागत स्वीकारण्याचा आग्रह करण्यात आला. ताईंना तो आग्रह मोडता आला नाही.अनेक ठिकाणी घरात जात ताईंनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली.काही ठिकाणी वृद्ध मंडळी आजारी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी घरात जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
वृद्धांचे आशीर्वाद….
सायंकाळच्या वेळी घरासमोर निवांतपणे बसलेल्या वृद्धांचे दर्शन घेत ताईंनी त्यांच्याशी संवाद साधला.प्रकृतीची चौकशी केली.कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले.या मंडळींनी ताईंच्या डोक्यावर हात ठेवत निवडणुकीतील विजयासाठी आशीर्वाद दिला.आपण कोणाला मतदान करणार असे त्यांनी विचारताच कमळ असे उत्तर ही मंडळी देत होती.
लाडक्या बहिणींची साथ…
गावात गेल्यानंतर महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून ताईंनी त्यांच्याकडे शासनाच्या योजनां संदर्भात चौकशी केली.लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला की नाही ? हे देखील विचारले.सर्व महिलांनी ही योजना अत्यंत उपयोगी असून गावातील बहुतांश महिलांना लाभ मिळाला असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.
