महाविकास आघाडीला खिंडार किल्लारी, खरोसा, मातोळा गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा महायुतीत प्रवेश..
औसा – विधानसभेच्या निवडणूकीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान प्रचाराचा धुरळा राज्यभर उठला असताना त्यादरम्यानच अनेक पक्षांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहे. महाविकास गटालाही आमदार अभिमन्यू पवार यांनी धक्का दिला आहे.मतदारसंघातील किल्लारी, खरोसा व मातोळा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे.आ अभिमन्यू पवार यांच्या कामावरती विश्वास ठेवून हा प्रवेश केला असून आम्हाला त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांचे काम पाहिले आहे.मतदारसंघाच्या विकासासाठी अशा नेत्याची गरज असून मतदारसंघात सर्व भागात पक्ष वाढी, बळकटीसाठी झटणार असल्याची प्रतिक्रिया पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खरोसा गावचे विद्यमान उपसरपंच व युवा सेना औसा तालुका विधानसभा प्रमुख विशाल बालाजी क्षिरसागर, किल्लारी गटातील आकाश सितापुरे, मातोळा गटातील दत्ता नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी (दि.२) नोव्हेंबर रोजी संतोष सुभाष मुक्ता संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप पक्षात प्रवेश घेतला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजपचे जिल्हा प्रभारी सुभाष मुक्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, सुशीलदादा बाजपाई, औसा शहर अध्यक्ष सुनील उटगे ,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे, माजी नगरसेवक संगमेश्वर ठेसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रदीप मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख बंडू कोद्रे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे भाजप सोडून बाकी पक्षांना मालक आहे. भाजप पक्षाला मात्र चालक आहे. आणि कधीही बदलू शकतो सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला येथे काम करण्याची संधी मिळू शकते. कधीकाळी दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज सर्वाधिक खासदार आहेत. तर जगातील सर्वात मोठी पार्टी भाजप आहे. देशाच्या प्रथम झेंड्यावर देशभक्ती असून त्या विचारावरच आम्ही वाढलो आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने अंत्योदय संकल्पना मांडली त्या दिनदयाल उपाध्य यांचे विचार घेऊन आम्ही चालतो आणि त्या विचाराने काम करणारा मी आमदार आहे. असे सांगून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल त्यांना एका चांगल्या पक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे असे वाटेल असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव मुरगे तर आभार धनराज परसने यांनी मानले……
…………
आलमला येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात..
आलमला येथील काॅग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शशी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश घेतला. आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे जिल्हा जाधव, जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता यांनी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले..
