काँग्रेस पक्षात ‘मनसे’तील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रवेश
लातूर/ प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात शनिवारी प्रवेश केला. त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी पक्षकार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मळवटी येथे दगडवाडी येथील मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ज्ञानेश्वर राठोड, ऋत्विक राठोड, आकाश गायकवाड, विकास बोंबळे, किशोर गायकवाड, अनिल राठोड, अमोल गायकवाड, अविनाश जाधव, महादेव जाधव, प्रसाद राठोड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, संभाजी सूळ, राजकुमार पाटील, स्वयंप्रभा पाटील, शंकर बोळंगे, चंद्रकांत देवकते, अमृत जाधव, संतोष माने, ज्ञानोबा गवळे, एल बी पाटील, रघुनाथ शिंदे, बालाजी सुरवसे, सिद्धेश्वर स्वामी, दगडू कांबळे, सोनेराव गरड, श्रीकांत बैले, सिद्धार्थ सोनवणे, चिंतामणी कदम, मुकुंद शिंदे, नितीशकुमार शिंदे, विनोद वीर आदी उपस्थित होते.पक्षातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत पक्षाचा विचार आणि पक्षाचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिला.
