धनगर, बंजारा ,महादेव कोळी,मातंग,यलम,समाजाने केला आ. संभाजीरावांच्या विजयाचा संकल्प
मेळावे घेऊन निलंगेकराना दिला पाठींबा !
निलंगा/प्रतिनिधी:
मागील 24 वर्षापासून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारसंघातील गोरगरीब सामान्य कष्टकरी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व धर्मातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस विरुद्ध आघाडी करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हापासूनच सर्व धर्मातील जातीचे लोक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. सर्व धर्माला न्याय दिला आहे. त्याचबरोबर वेळोवेळी सत्तेचा समान वाटा सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिलेले आहेत, त्यामुळे या निवडणुकीत धनगर, मातंग,महादेव कोळी, यलम, बंजारा, या समाजाने समाज मेळावे घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विजयाचा संकल्प करून त्यांना विजयासाठी पाठिंबा दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी काढलेली जनसन्मान पदयात्रा,बुथ पदाधिकाऱ्यांचे व धनगर समाज, कोळी, बंजारा समाज,व मातंग समाजाचे भव्यदिव्य मतदारसंघात समाज मेळावे घेतले या मुळे सर्व समाज बांधव भाजपच्या विचाराशी जोडण्यात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना यश आले आहे, समाजांच्या मेळाव्यांमुळे संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघ भाजपमय झाला आहे.मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे मतदारांच्या कायम संपर्कात राहतात.मागील अनेक वर्षांपासून त्यांचा तीनही तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांशी थेट संपर्क आहे.सामान्य लोकांचे फोनही ते उचलतात.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आ.निलंगेकर यांनी जनसन्मान पदयात्रा काढत मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गटनिहाय बुथ मिळावे घेतले.पदाधिकाऱ्यांच्या अडचणी या माध्यमातून त्यांनी समजून घेतल्या.दुसऱ्या टप्प्यात विविध समाजांने मेळावे घेतले. त्या मेळाव्यात सर्व समाजाने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना विजयी करण्याचा संकल्प करून पाठींबा दिला आहे.
धनगर समाजाचा विश्वास संपादन करताना ते म्हणाले महायुती सरकारनेच धनगर समाजाचा सन्मान केला आहे.आरक्षणाचा प्रश्नही महायुती सरकारच निकाली काढेल.सरकार आल्यानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल,असा विश्वास आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.
वलांडी येथे निलंगा मतदारसंघातील धनगर समाजाचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी समाज बांधवांना असे अभिवचन दिले, त्याच बरोबर निलंगा येथे बंजारा समाजाचा मेळावा संपन्न झाला.बंजारा समाजाचा आजवरचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,अशी ग्वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली त्याच बरोबर त्या समाजातील महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन विचार पूस केली, त्यानंतर निटूर येथे महादेव कोळी समाजाचा अतिशय भव्यदिव्य समाज मेळावा झाला
यावेळी त्यांनी सांगितले , तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रकरणी अन्यायकारक भूमिका घेतली.त्यामुळे हा समाज अडचणीत सापडला असून निलंगा मतदारसंघात आपण हा प्रश्न निकाली काढला आहे. याच धर्तीवर महायुतीचे सरकार संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न निकाली काढेल,असा विश्वास माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
निलंगा येथे आयोजित मेळाव्यात आ, निलंगेकर म्हणाले ‘प्रामाणिक तेचा समानार्थी दुसरा शब्द मातंग’ आहे, हा समाज अतिशय प्रामाणिक कष्टकरी असून दिलेला शब्द पाळणारा समाज आहे, आज मुलीचे सर्व शिक्षण आपल्या शासनाने मोफत केले आहे, मातंग समाजातील होतकरू मुलींना उच्च शिक्षणासाठीच्या होस्टेल आणि मेसची जबाबदारी मी संभाजीराव पाटील निलंगेकर घेत आहे .अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मेस आणि होस्टेलचा संपूर्ण खर्च अक्का फाउंडेशन उचलेल असे अभिवचन त्यांनी सर्व मातंग समाजाला दिले,त्याच बरोबर यलम समाजाच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या समजाला सदैव न्याय देण्यास व राजकीय वाटा देण्यास कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे.
त्यामुळे असे निलंगा विधानसभा मतदारसंघात विविध समाज मेळाव्याच्या माध्यमातून त्या समाजातील अडीअडचणी जाणून घेऊन त्या समाजाच्या हृदयाशी भिडण्याचा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असून समाज मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला भाजपशी जोडण्याचे काम आ.निलंगेकर यांनी केले आहे. यामुळे त्यांना मिळणारे पाठबळ वाढत आहे.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची धोरणे व विचार पटत असल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक त्यांच्या थेट संपर्कात येतात.याचा प्रत्यय उमेदवारी अर्ज भरताना आला.त्या दिवशी जमलेल्या गर्दीनेच खऱ्या अर्थाने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.आता दीपावली नंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.दीपावली नंतर मतदारसंघात प्रदेश पातळीवरील मान्यवर नेत्यांच्या सभा होणार आहेत.या सभामुळे निलंग्यात भाजपचा विजय सुकर होणार आहे.प्राथमिक पातळीवर निलंगा मतदारसंघ संपूर्णपणे भाजपमय झाला असून आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विजय निश्चित दिसत आहे.
