• Tue. Apr 29th, 2025

दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद 

Byjantaadmin

Nov 3, 2024

दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद 

   निलंगा/प्रतिनिधी :दीपावलीचा मुहूर्त साधत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील गावागावात जात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या दीपावलीच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साही वातावरण आहे. हा योग साधत आ. निलंगेकर यांनी मतदार संघातील जवळपास ३० गावात दौरा केला.निलंगा तालुक्यातील वांजरवाडा,शिरोळ (वांजरवाडा),होसुर, डांगेवाडी,माचरटवाडी, खडक उमरगा,मन्नथपूर, सावनगिरा,बोटकुळ, बोरसुरी,शेंद,केदारपुर, मसोबावाडी,अंबेवाडी (म),दगडवाडी, हणमंतवाडी हलगरा या गावांना भेटी दिल्या.शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ, बोळेगाव (बु.),सावरगाव, तळेगाव बोरी,बेवनाळ, अंकुलगा राणी,हालकी, जोगाळा,हणमंतवाडी, सुमठाणा,आनंदवाडी, तुरुकवाडी,घुग्गी सांगवी, बाकली,बिबराळ, डोंगरगाव बोरी,बेवनाळवाडी,वांजरखेडा, होनमाळ येथे जात आ. निलंगेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

   जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, मंगेश पाटील,माजी सभापती गोविंद चिलकुरे, संतोष शेटे,संगायो अध्यक्ष अनिल शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ डोंगरे,माजी जि.प.सदस्य ऋषिकेश बद्दे,संतोष डोंगरे यांच्यासह स्थानिक  पदाधिकारी,नागरिक आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

   विविध गावातील नागरिकांशी संवाद साधताना आ.निलंगेकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली.प्रधानमंत्री आवास योजना,लाडकी बहीण योजना यासारख्या लोकप्रिय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ग्रामीण भागाचे रूपडे पालटल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. लाडकी बहीण योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असल्याचे उपस्थित महिलांनी आ.निलंगेकर यांच्याशी संवाद साधताना सांगितले.उज्वला गॅस योजना,शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा,शेतकऱ्यांना वीज बिल माफी,मोफत रेशन पुरवठा यासारख्या योजनांमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या असून यामुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचे मत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. दोन्ही तालुक्यात आ. निलंगेकर यांच्या या संवाद दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावोगाव महिलांनी भाऊबीजेनिमित्त त्यांचे औक्षण केले.विविध ठिकाणी आ.निलंगेकर यांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आले.आ. निलंगेकर यांनीही सामान्य नागरिकांच्या आग्रहाला प्रतिसाद देत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed