• Wed. Apr 30th, 2025

महाराष्ट्र महाविद्यालयाची यशोदा दिवे विद्यापीठात सर्वप्रथम

Byjantaadmin

Dec 16, 2022

महाराष्ट्र महाविद्यालयाची यशोदा दिवे विद्यापीठात सर्वप्रथम

निलंगा- येथील महाराष्ट्र महाविद्यालयाची बीसीए (संगणक शास्त्र) शाखेतील विद्यार्थीनी यशोदा दिवे हिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी परीक्षा 2022 परीक्षेत बीसीए शाखेतून घवघवीत यश संपादन करून विद्यापीठातून सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परीक्षा जून/जुलै २०२२ मध्ये कोव्हीड १९ नंतर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षांची शाखानिहाय गुणवत्ता यादी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड यांनी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्र महाविद्यालयाच्या बीसीए शाखेची विद्यार्थिनी कु. यशोदा राम दिवे हिने विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या यशामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यार्थिनीच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव श्री बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, ज्येष्ठ प्रा.डॉ. धनंजय जाधव, स्टाफ सचिव प्रा. सुरेश कुलकर्णी, संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. रवींद्र मदरसे, प्रा. गिरीश पाटील, प्रा. धनराज किवडे, प्रा. मयूर शिंदे, प्रा. शुभांगी शहापुरे, प्रा. संगीता जाधव, श्री सिध्देश्वर कुंभार, श्री मनोहर एखंडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *