महाराष्ट्र महाविद्यालयास विद्यापीठ “ज्ञानतीर्थ” युवक महोत्सवात सुवर्ण व रौप्य पदक
निलंगा- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन “ज्ञानतीर्थ” युवक महोत्सव-२०२४ दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान अत्यंत उत्साहात संपन्न झाला या युवक महोत्सवात महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील एकूण 16 विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. रांगोळी या कला प्रकारात अंकिता गुंडप्पा रुकारे या विद्यार्थिनीने सर्वप्रथम स्थान पटकावुन सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. महाविद्यालयाच्या वतीने शैलेश गोजमगुंडे द्वारे लिखित चिंगी या एकांकिकेचे समाधान महाराज उमरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण करण्यात आले. यात उत्कृष्ट पुरुष अभिनेता म्हणून रत्नशील तुकाराम सोनकांबळे सर्व द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकांचा मानकरी ठरला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, संस्थासचिव बब्रुबान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सहभागी संघात गीता वाडकर, गायत्री बिराजदार, कौश्यल्या बेलकुंदे, सिद्दिक पठाण, मुस्तफा शेख, अक्षय घोसले, पद्माकर पवार, गणेश लाडकर, प्रगती हवा, प्रणिता पवार, शितल माने, अमर तुरे या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. अजित मुळजकर, प्रा.मिनाक्षी बोंडगे, प्रा. सपना मोरे यांनी मार्गदर्शन केले
