महायुतीच्या काळात प्रत्येक ‘उंबरठ्या पर्यंत विकासाच्या योजना
कानावर नव्हे, डोळ्यावर विश्वास ठेवा दहा वर्षातील पासबुक पहा, ‘अन् काँग्रेस काळातीलही हिशोब जुळवा
माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर याचे अवाहन
विजय संकल्प बुथ प्रमुख बैठक प्रतिस्पर्धी पार्टीला ना दिशा ना दृष्टीकोन
.
निलंगा, : सत्तर वर्षे तुम्ही काँग्रेस सरकारची मयदानरुपी पेरणी केली तर भारतीय जनता पार्टीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाची पेरणी आपण केली या दोन्ही काळात विकास कामाच्या तफावतीतील बिजाची उत्पादकता तुम्हीच तपासावी दहा वषाच्या काळात प्रत्येक उंबरठ्याला कशी मदत होईल हेच धोरण सरकारने राबवली आहे. तेव्हा कानावर विश्वास ठेवू नका आपले पासबुक प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा म्हणजे त्याची प्रचिती येईल असा रोखठोक सवाल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बूथप्रमुखाच्या विजयी संकल्प मेळाव्यात गुरुवारी केला.
महायुतीचे सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असून शेतीपंपाचे वीज बिल, एक रुपयात पिक विमा, अतिवृष्टीच्या अनुदान, मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, सोयाबीन अनुदान, पोलीस पाटील मानधन, ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवकाचे मानधन, आशा वर्कर मानधन असे प्रत्येक समाजातील लोक उपयोगी निर्णय या सरकारने घेतली आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना सभागृह, रस्ते, गटार हे विकास कामे होतच राहणार परंतु प्रत्येक गावातील उंबरठ्याला कशी मदत करता येईल हेच धोरण युती सरकारच्या काळात राहिले आहे. मागील अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळातील व अडीच वर्षाच्या महायुतीच्या सत्तेच्या काळातील विकास कामाच्या निधीची तुलना करा काँग्रेसवाल्यांनी अडीच वर्षात काय विकास केला याची उत्तर द्यावे व आम्ही मतदार संघात किती निधी आणला हे पण दखवू असे आव्हान त्यांनी माजी मंत्री आम्ही देशमुख यांचे नाव घेऊन दिले. काँग्रेसकडून केवळ जातिपातीचे राजकारण केले असून मताचे धुर्विकरण करून आजपर्यंत त्यांनी सत्ता भोगली आहे. काँग्रेसला मतदान का करावे व भारतीय जनता पार्टीला मतदान का करावे या दोन्ही पक्षाची तुलना मतदारांनी सद्सद विवेक बुद्धीने विचार करून करावी असे सागून अमित देशमुख यांनी अडीच वर्षाच्या सत्तेतील एक तरी ठोस काम सांगावे अशी आव्हान त्यांनी यावेळी दिले.
देवणी तालुक्यातील रस्त्याचा अनुशेष भरून काढला-युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर

दहा वर्षांपूर्वी देवणी तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्या रस्त्याचा अनुशेष आपण भरून काढला असून मतदारसंघातील मोठ्या रस्त्याबरोबरच गावअंतर्गत रस्ते सुद्धा चांगले केले आहेत. आपले मतदान आमदारासाठी नाही तर नेत्याला मतदान आहे. विरोधकाकडे दिशादृष्टी काहीच नाही केवळ आरोप करणे एकमेव काम आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारने शेतकरी शेतमजुरांना केंद्रबिंदू ठेवून योजना आखले आहेत.ही निवडणूक देशाला आणि राज्याला कलाटणी देणारी निवडणूक आहे.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढील 25 दिवस समर्पित भावनेने काम करावे असे आव्हान शेवटी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले
यावेळी ,निलंगा,सांगायो अध्यक्ष,शेषेराव ममाळे,सभापती शिवकुमार चिंचनसुरे,नरसिंग बिरादार, माजी सभापती संजय दोरवे,माजी जि. प.सदस्य प्रशांत पाटील, दगडू सोळुंके, काशिनाथ गरिबे ,हुडगे सावकार,बिराजदार मामा,आदीची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील यांनी मानले.