माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना
शिष्टमंडळाने घेतली भेट विविध मागण्यांचे दिले निवेदन
लातूर (प्रतिनिधी) १६ डीसेंबर २२ :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी बाभळगाव निवासस्थानी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना शिष्टमंडळाने भेट घेऊन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करणे व वार्षिक वेतन वाढीसह विविध मागण्या बाबतचे निवेदन दिले.
यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या येत्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडून त्या सोडवू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. तसेच या आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे व त्यांना नियमित वेतनवाढ मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे, आश्वासन याप्रसंगी शिष्टमंडळाला त्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे लातूर तालुका अध्यक्ष डॉ. दीपक देशमुख, राज्य सल्लागार डॉ. चंद्रशेखर जाधव, सचिव डॉ. अली कुरेशी, डॉ. किरण कराळे आदी उपस्थित होते.