निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश
निलंगा:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार , प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,खा.सुप्रियाताई सुळे,आ. रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत दिनांक शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी भवन, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे
लातूर जिल्हा कॉंग्रेस चे माजी अध्यक्ष, नळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड संभाजीराव पाटील(शिरूर अनंतपाळ), लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ,संभाजीनगर उच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ ॲड एन पी पाटील जमालपुरकर,भाजपा नेते ॲड विनायक बाजपाई कृउबा शिरूर अनंतपाळ चे माजी उप सभापती बाबुराव बिराजदार, माजी खा. कै. अरविंद कांबळे यांच्या पत्नी श्रीमती आशाताई अरविंद कांबळे,चिरंजीव श्री दिपकअरविंद कांबळे,जावई ॲड नरेश सोनवणे,मुलगी जोती अरविंद कांबळे, ॲड निखिल बाजपाई, ओबीसी नेते प्रा.डॉ.धनंजय बेडदे, जेष्ठ विधिज्ञ ॲड मंचकराव ढोणे, जेष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे,इमामसाहेब शेख, विश्वनाथ बरगे, लालाभैया मुजेवार, रमेश उंबरगे, प्रमोद धुमाळे, गुरूनाथ आचवले, संजयपानगावे, सोमनाथ तांबोळकर, विद्यासागर येरोळे, रमेश बिराजदार, विद्यासागर पौळकर, बंडू कोरे, संजय व्यंजने, न. प. माजी सभापती संजय बनसोडे, अमिन मुजेवार, रविंद्र माशाळकर आदी मान्यवरांचा हजारोंच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला.
याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नगराळकर, माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणीस प्रा. शिवाजी मुळे, जिल्हाअध्यक्ष संजय शेट्टे,प्रदेश संघटक सचिव निळकंठ मिरकले व दत्तात्रय काकडे, सचिव सोमेश्वर कदम व प्रा.माधव गंगापुरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव भोसले गुरूजी, जिल्हा उपाध्यक्षा सौ अंजली पाटील, जिल्हा सरचिटणीस केदार काडवादे, जिल्हा सरचिटणीस ॲड विवेक बिरादार, निलंगा तालुका समन्वयक अंगद जाधव,किरण सोळुंके, महेश चव्हाण,सचिन राजनाळे , सुरेश रोळे, सचिव मन्मथ कोनमारे, सचिव सौ विजया मलशेट्टी, आनंद चट पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिरीष वडजे पाटील, जळकोट तालुकाध्यक्ष नेमचंद पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव महादेव आवाळे, शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष व्यकंट हंद्राळे, युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष संतोष सारंगे, रायुकॉशप चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सुर्यवंशी यांच्यासह लातूर जिल्ह्यातून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.
