• Tue. Apr 29th, 2025

शिरुर अनंतपाळ शहरातील प्रभाग.13 मधील विवीध विकास कामे पूर्ण

Byjantaadmin

Oct 20, 2024

शिरुर अनंतपाळ शहरातील प्रभाग.13 मधील विवीध विकास कामे पूर्ण

शिरुर अनंतपाळ शहरातील नगरसेवक. सुधीर लखनगावे यांच्या प्रभागातील 65 लाख रुपयाचे विवीध विकासकामे पुर्ण

  शिरुर अनंतपाळ:- नगरपंचायतचे कार्यक्षम व अभ्यासु नगरसेवक. सुधीर लखनगावे यांनी विशेष प्रयत्न करुन 65 लाख रुपयाचे  मंजुर कामांचा आपल्या प्रभाग क्र.13 मध्ये दर्जेदार उत्तम प्रतीचे 4 सिमेंट काँंक्रेट रोड 700 मिटीर लांबी, भुमीगत गटारी, 4 विंधन विहीर ( बोअरवेल ), 6 सोलार मिनी हायमस्ट, जि. प. शाळा. भोजराजनगर परिसरात पेव्हर ब्लाँंक, भोजराजनगर अंगणवाडी दुरुस्ती, शाळा वर्गखोली बांधकाम यासाठी काँंग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते. अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या शुभहस्ते व डाँं. शरद पाटील निलंगेकर यांच्या  यांच्या प्रमुख विशेष ऊपस्थीतीत विकासकामांचा उद्दघाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला होता..प्रभागातील मंजुर असलेले  कामे पुर्ण झाल्याबद्दल प्रभागातील नागरिकांकडुन नगरसेवक. सुधीर लखनगावे यांचे अभिनंदन होत आहे..तसेच  प्रभागातील नागरिकांच्या गरजेनुसार प्रलंबीत कामे भविष्यात पुर्ण करण्याचे आश्वासन नगरसेवक. सुधीर लखनगावे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed