बी. चंद्रकांत रेड्डी यांनी टाकला लातुरात कुंटणखान्यावर छापा
लातूर : लातूर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार असलेले (सद्या नियुक्ती चाकूर उपअधीक्षक) सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व त्यांच्या पथकातीलअधिकारी-कर्मचारी यांनी लातूर शहरातील वैभवनगर भागातील चार मजली इमारतीत चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड टाकून कुंटणखाना चालविणारी महिला, तिचा एक मुलगा व दोघा नोकराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्याकडे सद्या लातूर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा पद्भार आहे. त्यांना लातूरच्या वैभवनगर भागात काही पिडीतांना स्वतःचे घरी ठेऊन घेऊन स्वतःचे फायदेसाठी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहितीमिळताच ते स्वतः व सहकारी यांनी वैभवनगर, लातूर येथील एका चारमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील दोन खोल्यांचे दार ठोठावले असताना बनावट ग्राहक आणि तीन पिडीत महिला आढळून आल्या. याचवेळी या कुंटणखान्यात नोकर म्हणून काम करणारे आढळून आले.
त्यांची अधिक चौकशी करता ‘आशा’ नामक महिला व तिचा मुलगा या इमारतीत तीन महिलांना ठेऊन घेऊन पुरूष ग्राहक बोलावून घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत व स्वतः प्रती ग्राहक ठराविक रक्कम घेत असल्याचे सांगण्यात आले. कुंटणखाना चालविण्याकामी ‘आशा’ला तिचा मुलगा मदत करित असत. या ईमारतीत छापा टाकला तेंव्हा तीन पिडीत महिला आढळून आल्या. त्यातील एक महिला वाशीम, एक धाराशिव जिल्ह्यातील तर एक लातूर शहरातील आहे. ईतर दोन पुरूष यावेळी आढळून आले. त्यांनी आपण या कुंटणखान्यावर नोकर म्हणून काम करित असल्याचे सांगितले.पोलिसांनी या छाप्या दरम्यान त्या खोल्यामधून कंडोमची काही पॉकेटही जप्त केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी स्वतःच्या फायद्यासाठी कुंटणखाना चालविणारी महिला, तिचा मुलगा व नोकर म्हणून काम करणारे दोन पुरूष अशा चौघांविरूद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, महिला पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे, पोलीस कर्मचारी पारडे, कुटवाडे, क्षीरसागर, शिंदे, कोमवाड, मुळे, बोचरे, लहाने यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी लातूर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा तात्पुरता पद्भार घेतल्यानंतरची त्यांची कुंटणखान्यावरील ही मोठी कारवाई आहे.
