लातुरात महायुतीचा तर निलंग्यात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ही ठरेना!
लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची चुरस
लातूर(मोईज सितारी):–राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची वारे जोरात वाहत असून कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम घोषित करून आचारसंहिता लागू केली आहे.
लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ असून त्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण,निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर याचा समावेश आहे 2019 च्या निवडणुकीत पक्षीय बलाबल काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाजपाचे दोन असे आमदार होते .परंतु 2024च्या राजकीय बदलल्या समिकरणा मुळे जिल्ह्यात वेळग चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील 4 विधानसभेचे लढतीचे चित्र जवळपास निश्चित आहे उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुध्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रमुख लढत होईल असेच संकेत आहेत.
उदगीर विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार यांच्या पक्षाचे
विद्यमान आमदार तथा मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजपा मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यात प्रमुख लढत होईल असे बोलले जात आहे. तर अहमदपूर मध्ये ही अजितदादा पवार यांच्या पक्षाचे विद्यमान मान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपा मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल असे बोलले जात आहे.दुसरी कडे औसा विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न आहे ही जागा जर शिवसेना ठाकरे गटाला गेली तर माजी आमदार दिनकर माने यांनी मिळेल असे बोलले जात आहे जर काँग्रेस पक्षाला मिळाली तर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे उमेदवार असू शकतात.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या विरोधात महायुती चा उमेदवार कोण ? ही जागा महायुती मध्ये शिंदे गट मागणी करीत असल्याचे सांगितले जाते .शिंदे गटाचे सचिन दाणे यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे तर भाजपा कडून विधानपरिषद आमदार रमेश कराड, यांचे नावे चर्चेत आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघात
भाजपचे माजी मंत्री विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची जिल्हाभर चर्चा आहेकाँग्रेस पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी ची मागणी केली आहे पण अजून उमेदवार कोण ठरेल हे अद्याप गुलगस्त्यात आहे काँग्रेस मधून अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके यांच्या उमेदवारी साठी चुरस असल्याचे बोलले जात आहे.लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या विरोधात भाजपा उमेदवार ही ठरेना.भाजपा ,डॉ अर्चना पाटील चाकूरकर, देविदास काळे, अजित पाटील कव्हेकर ,प्रेरणा होणराव यांनी उमेदवारी ची मागणी केल्याचे समजते पण इथे ही भाजपा ला उमेदवार ठरविताना कसरत करावी लागत आहे.विशेष म्हणजे लातूरच्या माजी मंत्री अमित देशमुख व निलंग्याच्या माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात विरोधात अद्याप ही उमेदवार स्पष्ट नसून परंतु ऐनवेळी कोण येईल आजच्या घडीला सांगता येणं कठीण आहे…
