महाराष्ट्र महाविद्यालयात महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जाणीवा कार्यक्रम संपन्न
निलंगा – येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील “महिला सक्षमीकरण कक्षाच्या” वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून “महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जाणीवा” या विषयावर डॉ. रोहिणी पौळकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके होते तर डॉ. स्नेहा मुळजे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. पौळकर मॅडम महिला सक्षिमिकरण आणि महिलांना आरोग्यविषयक कोणत्या कोणत्या समस्या असू शकतात आणि त्यासाठी त्यांनी कुठली काळजी घेणे आपेक्षित आहे यावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील युवती आणि प्राध्यापिका यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून डॉ. रोहिणी मॅडम यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, ग्रंथपाल मीनाक्षी बोंडगे आणि महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक मनीषा घोगरे विचारपिठावर उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मुलींना मुक्तपणे संवाद साधून आपले वैद्यकीय ज्ञान अद्यावत करावे आणि त्या ज्ञानाचा विद्यार्थिनींनी त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी उपयोग करावा असे विद्यार्थ्यानींना आव्हान केले. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पौ्र्णिमा माने यांनी केले, प्रास्ताविक मनीषा घोगरे यांनी केले तर आभार गोदावरी बसुदे यांनी.मानले.
