• Tue. Apr 29th, 2025

दिवाळीपुर्वी संपूर्णशहर स्वच्छ, सुंदर करावे, नव्याने मंजूर झालेल्या सर्व योजनांची कामे दर्जेदार पध्दतीनेवेळेत पूर्ण करावीत-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Oct 16, 2024

दिवाळीपुर्वी लातूर शहर स्वच्छ सुंदर बनवावे सर्व विकास योजनांची कामे दर्जेदार करावत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क विकासाचा सर्वकक्ष अराखडा तयार करावा महीलांसाठी मोफत सीटीबस योजना चालूच ठेवावी
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून

लातूर मनपा कामकाजाचा आढावा

लातुर प्रतिनिधी- लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नवीन एजन्सी आली आहे. दिवाळीपुर्वी संपूर्ण
शहर स्वच्छ, सुंदर करावे, नव्याने मंजूर झालेल्या सर्व योजनांची कामे दर्जेदार पध्दतीने
वेळेत पूर्ण करावीत शहर वाहतुकीला शिस्त लावावी, सीटी बसमधील महीलांसाठी मोफत बस
प्रवास योजना सुरुच ठेवावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सर्वकक्ष विकास अराखडा तयार
करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळयाची उभारणी करावी आदी
सुचना, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज सांयकाळी लातूर शहर
महानगरपालीका आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत.
सोमवारी सांयकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर
महानगरपालीका कार्यालयात जाऊन शहरातील विविध विकास योजनांच्या संदर्भाने आढावा
बैठक घेतली. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे सर्व विभाग प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी
उपस्थित होते.
मागच्या काळात लातूर शहरातील कचरा व्यवस्थापना बाबत अनेक तक्रारी होत्या आता
नव्या एजन्सिला हे काम दिले असून ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम सुरू
झाले आहे. शहरातील सव्वा लाख घरावर क्युआर कोड स्कॅनर बसवीले असून या व्दारे
घंटागाडीची नियमतता तपासली जाणार आहे. कालच या सुवीधेचा शुभारंभ माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला आहे. कचरा व्यवस्थापन अत्यंत प्रभावी आणि
पारदर्शक पध्दतीने करण्यात यावे असे निर्देश या बैठकी दरम्यान त्यांनी दिले.
शहरात लवकरच ५० नवीन इलेक्ट्रिक सीटीबस दाखल होत आहेत. त्याचे व्यवस्थीत
वेळापत्रक तयार करावे. जवळपासच्या गावात ही सुवीधा सुरू करावी. महाविकास आघाडीच्या

जाहीरनाम्यात महीलांना मोफत सीटीबस योजना चालू करण्या बाबत आश्वासन देण्यात येणार
आहे. त्यामुळे लातूर शहरात महीलांसाठीची मोफत सीटीबस योजना पूढे सुरूच ठेवावी.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी. फेरीवाला धोरणाचा नव्याने आढावा घेऊन
त्यांची ताबडतोब अंमलबजावणी करावी. शहरात चार दिवसाला नियमीत स्वच्छ पाणीपुरवठा
करावा. पटेल चौकातील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या वतीने
उभारण्यात येत असलेल्या १८९ खाटाच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागे बाबत त्वरीत
कार्यवाही करावी, नव्याने शहरात मंजूर केलेल्या विकासयोजना दर्जेदार पध्दतीने वेळेत पूर्ण
कराव्यात, निवडणूक कालवधी असला तरी विकासकामे सुरूच ठेवावीत. मांजरा धरणावरुन
येणाऱ्या संमात्तर पाईपलाईनचे व भुमिगत गटार योजनेचे काम लवकरात लवकर सुरू करावे,
लिंगायत, गोसावी, वैदू समाजासाठी स्मशानभुमीचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा आदी
सुचना यावेळी देण्यात आल्या.
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर उभा राहवयाच्या भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा उभारणी संदर्भात सदयस्थितीची माहीती घेऊन संपूर्ण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वकक्ष विकास अराखडा तयार करण्याच्या सुचना
आमदार देयामुख यांनी दिल्या. या परीसरात असलेले हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतीबा फुले
यांचा पुतळा, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, संविधान स्तंभ, ग्रंथालय,
उदयान या सर्व गोष्टीचा या अराखडायात समावेश करावा या मैदानावर पून्हा पाणी साचणार
नाही यांचेही नियोजन करावे, चांगल्या वास्तुवीशारदकडून हा अराखडा बनवून घ्यावा आदी
सुचना यावेळी आमदार देशमुख यांनी दिल्या आहेत.
या बैठकी दरम्यान मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात
राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहीत दिली. याप्रसंगी लातूर मनपात नव्याने
रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांचे स्वागत
करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed