माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी गुणगौरव सोहळा संपन्न
निलंगा:-प्रशासकीय व्यवस्थेचा कणा म्हणजे व्यवस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी. प्रशासन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व गुणवान अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह, निलंगा येथे संपन्न झाला. यावेळी सर्व प्रशासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी बांधवांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचे स्तंभ म्हणजे प्रशासन. सरकारने लागू केलेल्या सर्व लोककल्याणकारी निर्णय लागू करणे, ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, नागरिकांचा विकास आणि त्याचबरोबर त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे असे व्यापक व दुहेरी कार्य प्रशासन करत असते. त्यामुळे यामध्ये कार्यरत असेल प्रत्येक घटक समाजाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावत असून त्यांचे कार्य समाजावर दूरगामी परिणाम टाकणारे आहे, अशी भावना या प्रसंगी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी व्यक्त केली.
यावेळी निलंगा तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, देवणी तहसीलदार सोमनाथजी माळी, शिरूर अनंतपाळ तहसीलदार जी.आर. पेद्देवाड जी, निलंगा गटविकास अधिकारी सोपानजी अंकेले, देवणी गटविकास अधिकारी किरणजी कोळपे, शिरूर अनंतपाळ गटविकास अधिकारी बी.टी चव्हाण जी, कार्यकारी अभियंता महावितरण निलंगा संजयजी पवार, उपकार्यकारी अभियंता महावितरण निलंगा शिवशंकरजी सावळे, सहाय्यक अभियंता महावितरण शिरूर अनंतपाळ दिपकजी पळसे, सहाय्यक अभियंता महावितरण रविकामजी लिंबोणे, तालुका आरोग्य अधिकारी निलंगा डॉ. प्रदिपजी कुमार जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शिरूर अनंतपाळ डॉ. नारायणजी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी देवणी डॉ. रामचंद्रजी मोहिते, तालुका कृषी अधिकारी निलंगा अनिलजी शेळके, तालुका कृषी अधिकारी शिरूर अनंतपाळ लक्ष्मणजी खताळ, तालुका कृषी अधिकारी देवणी संजयजी पाटील, निलंगा विधानसभा प्रभारी दगडूजी सोळंके, निलंगा तालुका अध्यक्ष कुमोदजी लोभे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेशजी पाटील, नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
