महाराष्ट्र महाविद्यालयात वाचन “प्रेरणा दिन ” साजरा
वाचन संस्कृती वाढण्यासाठी पहिली ग्रंथपेटी विद्यार्थ्यांसाठी खुली
निलंगा:- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, ‘मिसाईल मॅन” डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एन.कोलपुके यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी खुल्या केलेल्या १००० पुस्तकांपैकी पहिल्या १०० ग्रंथांची “ग्रंथपेटी” विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी बोंडगे यांनी “ग्रंथपेटी” उपक्रमाची माहिती देऊन केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी यासाठी ग्रंथालयाने विविध उपक्रम राबवावेत असे मत प्राचार्य डॉ. एम. एन.कोलपुके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ग्रंथालय सल्लागार समितीचे सर्व सदस्य तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड प्रा. गोविंद शेंडगे, डॉ.सुभाष बेंजलवार, डॉ. गोविंद शिवशेट्टे, रा.से.यो.चे डॉ. विठ्ठल सांडूर ,डॉ. अजित मुळजकर, डॉ. शशिकांत देवनाळकर , डॉ. सचिन बसुदे ,प्रा. रामेश हिरेमठ, प्रा. गिरीश पाटील ,श्री. रमेश लोंढे, ग्रंथालयातील कर्मचारी श्री. तनवीर मणियार ,अंजना रंगदळ, श्री.माधव शिंदे,रिजवान शेख ,डोंबाळे करण तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
