महाविकास आघाडी म्हणजे विकासाचा गतिरोधक ;निलंगा व देवणी बसस्थानकाच्या लोकार्पणप्रसंगी आ. निलंगेकरांची टीका
निलंगा दि. ११ (प्रतिनिधी) : गत विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळालेले असतानाही केवळ स्वत:चा स्वार्थ व हित जोपासण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्रित आले होते. या तीन पक्षांनी चालविलेले सरकार हे महाविकासाचे नव्हते तर महाभकास करणारे होते. या सरकारच्या कार्यकाळात विशिष्ठ घटकांना व विशिष्ठ भागांना विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता, असा आरोप करीत महाविकास आघाडी म्हणजे विकासाचा गतिरोधक असल्याची टिका करून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी गत अडीच वर्षात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने सर्व समाज घटकांना सोबत घेत राज्यातील प्रत्येक भागासाठी विकासाची गंगा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही सर्वागिण विकासासाठी महायुतीला साथ द्यावी असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
निलंगा व देवणी येथील नुतन बसस्थानकाचे लोकर्पण माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विधानसभा प्रभारी दगडु सोळुंके, तालुकाध्यक्ष कुमुद लोभे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, विभागीय नियंत्रक अश्विजीत जानराव, यंत्र अभियंता दिलीप जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, विभागीय अभियंता जगदीश कोकाटे, बाजार समिती सभापती शिवकुमार चिंचनसुरे, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान अकेले, माजी नगराध्यक्ष बाळसाहेब शिंगाडे, शहराध्यक्ष अॅड. विरभद्र स्वामी, उपजिल्हाध्यक्ष शेषेराव ममाळे, आदींसह अधिकारी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारांनी दिलेला कौल भाजप-सेनेच्या बरोबर असला तरी मतदारांचा विश्वासघात करत स्वत:च्या स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी महाविकास आघाडीची स्थापन होवून सरकार स्थापन केल्याचे सांगून आ. निलंगेकर यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात केवळ आणि केवळ स्वत:च्या बगलबच्चांचा आणि आपल्याच भागाचा विकास करीत इतर ठिकाणी मात्र महाभकास करण्याचे काम केले असल्याचे आरोप त्यांनी केले. यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने मात्र, समाजातील प्रत्येक घटकांना सोबत घेवून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले व ते सत्यातही उतरवले. शेतकºयांसह सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत महायुती सरकारने त्यांना लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळेच आपले सरकार अशी महायुती सरकारची प्रतिमा निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले. या सरकारमुळेच लाडकी बहिण योजना, शेतकºयांना मोफत वीज, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना अमंलात आणून त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवून दिलेला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयांचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे कर्मचाºयांसह महामंडळांची अवस्थाही बिकट झाली होती. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ दीडदिवसात महामंडळाचे प्रश्न मार्गी लावत कर्मचाºयांनाही दिलासा देण्याचे काम केले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
महामंडळाची लालपरी ही सामाजिक ऐक्याचे प्रतिक असून या लालपरीप्रमाणेच सामाजिक ऐक्य जोपासण्याचे कामही महायुती सरकारने केलेले असून निलंगा मतदार संघातही हे ऐक्य अधिक बळकट करण्याचे काम केले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना आणि केलेली विकास कामे जनतेला सांगणे आणि त्याचे लोकार्पण करणे हे गैर नसल्याचे सांगत टिका करणाºया विरोधकांनाही आ. निलंगेकर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. आगामी काळातही विकासाचा वेग विना गतीरोधक वाढला जावा यासाठी मतदारसंघातील जनतेने महायुतीला आशिर्वाद द्यावे, असे आवाहन आ. निलंगेकर यांनी यावेळी केले.
निलंगा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण
आ. निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये शहरात उभारण्यात आलेले उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाºयांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थान, सार्वजनिक बांधकामविभागाचे कार्यालय, नविन विश्रामगृह आणि कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पणही आ. निलंगेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यातआले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकामविभागाचे कार्यकारी अधिकारी गजानन क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी प्रदीपकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक हुग्गे,डॉ. दिनकर पाटील, डॉ. पी.टी. सोळुंके, डॉ.गणेश पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नर्मदा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिटचे आज उद्घाटन
निलंगा विधानसभा मतदारसंघासह उस उत्पादक शेतकºयांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना पुन्हा करत शेतकºयांच्या जिवनात क्रांती घडविण्याचे काम झालेलेआहे. निलंगा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात उसासोबतच सोयाबीन उत्पादकही मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात जवळपास खरिपाचा ८० टक्के पेरा सोयाबीनचा होतो. त्यामुळेच सोयाबीन उत्पादक शेतकºयांची अडचण होवू नये, त्यांनायोग्य भाग मिळावा आणि तात्काळ सोयाबीन खरेदी व्हावी, यासाठी आ. निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा येथील इनामवाडी परिसरात नर्मदा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट म्हणजे सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ विजयादशमीच्या मुर्हूतावर करण्यात येत आहे. या युनिटचे उद्घाटन माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तर माजी मंत्री आ. संभाजी पत्तटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता होणार आहे.या कार्यक्रमास शेतकºयांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आलेआहे.
