मसलगा येथे गुरुबाबा महाराज औसेकरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन…*
निलंगा प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील मसलगा येथे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार असून नाथ संस्थांचे अध्यक्ष सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते मंदिर बांधकामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मसलगा येथे सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते नारळ फोडून जागेची विधीवत पूजा करून येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे स्वरूप कसे असावे या संदर्भात गावकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत नाथ संस्थांचे अध्यक्ष गुरुबाबा महाराज औसेकर यांनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर कसे असावे मूर्ती कशा बसवाव्यात तसेच मंदिराचे कोरीव व भारदार काम कशा पद्धतीने करायचे आधी सूचना यावेळी मंदिर समितीसह गावकऱ्यांना दिल्या.
भूमिपूजनाचा कार्यक्रमानंतर सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी येथील आई तुळजाभवानी जगदंबा मातेचे दर्शन घेतले.
यावेळी सरपंच गणेश शेळके, दिनकर पाटील, मोहन पिंड ,विलास पाटील, गुरुनाथ जाधव, बाबुराव कावळे, भागवत पिंड, शेषराव पवार, शिवाजी कावळे, रमेश पाटील, बापूराव पाटील ,तुळशीदास साळुंके , बाबासाहेब पाटील, दत्तात्रेय पिंड, गोपाळ लव्हरे, संतोष नरहरे, गुरुनाथ पिंड, संतोष तोरखडे, शत्रुघन कदम, तातेराव पिंड, हरी कुलकर्णी, माधव पाटील, विठ्ठल जाधव, हरी साळुंके, ज्ञानेश्वर पिंड, शिवाजी जाधव, नारायण तेलंगे,बालाजी घोडके, संजय सलघंटे, मोहन शिंदे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
