समस्त मुस्लिम समाजाचा निलंगा येथे जन आक्रोश धरणे आंदोलन मोर्चा
निलंगा :-येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध आक्षेपार्य विधान करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे निलंगा येथे समस्त मुस्लिम समाजातर्फे जन आक्रोश धरणे मोर्चाआंदोलनउपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी व तसेच मुस्लिम समाजा वर धार्मिक हल्ले वाढले आहेत अशा प्रकारचे हल्ले होऊ नये याबद्दल सरकारने एक कठोर कायदा करावा लातूर शहरात आतापर्यंत कसल्याही प्रकारचे जातीय तेढ किंवा जातीय दंगली झालेल्या नाहीत परंतु गेल्या काही वर्षापासून लातूर येथे राजकीय संघटना व राजकीय पक्ष मुस्लीम विरोधी वातावरण तयार करत आहेत यामुळे मुस्लिम विरोधी हल्ले वाढत आहेत मुस्लिमांचे संरक्षण व्हावे या साठी मुस्लिम संरक्षण कायदा लागू करावा यावेळी काही मौलवी ने आपल्या भाषणात बोलले की इस्लाम हा शांतीप्रिय धर्म असून कसल्याही प्रकारच्या अशांततेत विश्वास ठेवत नाही परंतु ज्या वेळेस आमच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात जर कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल सर हा मुस्लिम समाज हे कदापी सहन करणार नाही रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात आलेले नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्याचे निवेदन माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले . सदरील निवेदनावर कारि गुलाम गौस,हबीब कारी,मुफ्ती रिजवान,हाफिज महेबुब रशिदी,हाफिज इद्रिस, मुफ्ती सिद्दिक झारेकर,हाफिज जावेद बरकाती,हाफिज मुजीब खुरेशी,मौलाना इलियास,सय्यद करिमुल्ला कादरी,यासह शेकडो मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते
सदरील आंदोलनाचे सूत्रसंचालन मुजीब सौदागर यांनी तर आभार कारी गुलाम गौस यांनी मानले सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी अजगर अन्सारी,बाबा बिब्राले,मुजीब सौदागर, अलीम पटेल,सबदर कादरी शारुख सय्यद शेरू बाबा उस्माणी आदींनी परिश्रम घेतले
