• Mon. Apr 28th, 2025

निलंगा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Byjantaadmin

Oct 11, 2024

निलंगा विधान सभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

देवणी,:- येथील सोमेश्वर मंगल कार्यालय येथे प्रमुख पदाधिकारी,बुथप्रमुख, सरपंच,चेअरमन यासह प्रतिष्ठित मान्यवरावरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचा मेळावा पार पडला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी जागा निलंगा विधानसभा लढविण्याचे स्पष्ट संकेत मागील काही दिवसापासुन चर्चेत आहेत त्या अनुषंगाने निलंगा विधानसभा मतदारसंघातील 4 ईच्छुकांनी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे स्वत: पवार साहेबांनी मुलाखती घेतल्या असुन निलंगा विधानसभा ताकदीने लढण्याकरिता कामाला लागण्याच्या सुचना केल्या आहेत.यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी,वक्ते यांनी मनोगत व्यक्त केले..यावेळी बोलताना निलंगा मतदारसंघातील घराणेशाही मोडुन काढण्याकरिता जनता इच्छुक असल्याचे मतही वक्त्याने यावेळी व्यक्त केले.

सतत मागील 2 वेळेस निलंगा मतदारसंघातील कांग्रेस चा मानहानीकारक पराभव झाला असुन जनतेचा कौल तुतारी कडे असल्याचेही मत व्यक्त केले.मागील काही महिने अगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा व औराद येथील निवडणुका मध्ये शिवसेना,कांग्रेस,राष्ट्रवादी कांग्रेस यांचे सोसायटी,ग्राम पंचायत मध्ये प्राबल्य असताना महाविकास आघाडीला  घराणेशाहीमुळे पराभवाला कसे सामोरे जावे लागले यावरही काही वक्त्याने परखड मत व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या तिन ही श्रेष्ठीने तिकीट वाटप करताना  वरील सर्व बाबी तपासुनच,निवडुन येणारा निकष लावूनच तिकीट वाटप करावे, प्रामाणिक व मँनेज न होणारा, जनतेचे व कार्यकर्त्याते हित लक्षात ठेवुन काम करणारा उमेदवारास तिकीट द्यावे, कार्यकर्ता लहान,मोठा न समजता प्रामाणिक कार्यकर्त्यास तिकीट द्यावे असा सुरही बैठकीत उमठला.

गेल्या पंचवार्षिक निलंगा विधानसभा निवडणुकीत  मतदान तोंडावर उमेदवार असताना नाँट रिचेबल होते अशी परिस्थिती निर्माण करणारे उमेदवार देवु नये असा सुरही बैठकीत उमठला.असेच कार्यकर्ता,बुथप्रमुख मेळावे शिरुर अंनतपाळ व निलंगा येथे होतील यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची भुमिका व धोरण स्पष्ट केले जाईल असे मत जिल्हा सरचिटणीस अँड.विवेक बिरादार यांनी व्यक्त केले.पक्ष श्रेष्ठी 4 पैकी जो उमेदवार देईल त्यांना निवडुन आणण्यासाठी राष्ट्रवादी व मविआ चे सर्वच घटक ताकदीने काम करतील असा सुरही बैठकीत उमठला

याप्रसंगी जेष्ठ नेते माजी आ.धर्माजी सोनकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ,जिल्हाध्यक्ष संजय शेटे,जेष्ठ विधिज्ञ ॲड सुरेश पाटील, पक्षाचे देवणी तालुकाध्यक्ष अमर आण्णा मुर्के, देवणी शहराध्यक्ष फकरोद्दीन बुद्रे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी कोयले, जिल्हा सचिव इदरीस भातांब्रे, ॲड नारायण नागरगोजे ,बाबुराव सुरवसे, माजी सरपंच उद्धव तवडे तालुका कार्याध्यक्ष संतोष बोचरे व राम शिंदे, महिला तालुकाध्यक्षा सौ.इंदुबाई पाटील, शहराध्यक्षा सौ.घोडके ताई, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिरीष वडजे पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पवनराज पाटील, पंढरी माने, संजीव माने, निलंगा तालुका समन्वयक अंगद जाधव, निलंगा युवक तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, संतोष चरपले, प्रदेश ओबीसी सहसचिव सुग्रीव सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे वाहतुक सेल जिल्हाध्यक्ष अंकुश गायकवाड व इत्यादी मान्यवर,कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed