महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला हीच भाजपची नित्ती सरकारविरोधात निलंगा युवक राष्ट्रवादी चे बोंबा मारो आंदोलन
निलंगा:-देशाचे पंतप्रधान जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्र दौर्यावर तेंव्हा तेंव्हा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला फरार…महायुतीचे सरकार डोळेझाक…शिंदे ,फडणवीस अजित पवार हे गुजरातधार्जीने मदत करत असुन यांना हद्दपार करावे या मागणीसह राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने उपविभागीय कार्यालय समोर बोंबा मारो आंदोलन करुन निषेध नोंदविला.निलंगा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना देण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे हेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला कळत नाही महाराष्ट्रातील उद्योग धंदे वेदांता फाँक्सगांन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअर बस, हिरे व्यापार, नाणार प्रकल्प,जैतापुर प्रकल्प तसेच अनेक भरपूर व आयटी कंपन्यासह महाराष्ट्रातील युवकाच्या हातचा रोजगार पळवुन महाराष्ट्रातील युवकांची बेरोजगारी वाढविण्यात भाजपा महायुतीचे सरकार कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने करण्यात आला.
पंतप्रधान व भाजपा महायुती सरकार मुंबई सह महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे हे वेळीच आवर घालुन हा पळवापळवीचा खेळ थांबवावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केला आहे.यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे, तालुका समन्वयक अंगद जाधव, शहराध्यक्ष इफरोज शेख, शहर युवकचे अध्यक्ष रोहन सुकाले,कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन राजनाळे, तालुका कार्याध्यक्ष मुस्सा पठाण,प्रमोद शिंदे, निजाम शेख,विशाल क्षीरसागर,जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे,जिल्हा चिटणीस संदिप मोरे, सुग्रीव सूर्यवंशी,अविनाश सुर्यवंशी,दत्ता शिंदे आदीची उपस्थिती होती.
