नारायणगडावर होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार
निलंगा/प्रतिनिधी
शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असा निर्धार सकल मराठा समाजाच्या दि.7 रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला. राज्यातील मराठा बांधवांची इच्छा होती की मराठ्यांचा दसरा मेळावा झाला पाहिजे,मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पारंपरिक दसरा मेळावा हा श्री क्षेत्र नारायणगडावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेळावा घेण्याचा निर्णय घेताच गावागावातील मराठा बांधवांनी मेळाव्याला जाण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका आयोजित करून मेळाव्याला जाण्यासंदर्भात चोख नियोजन करण्यात येत आहे.गेली चौदा महिने झाले मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे सरकारने याकडे लक्ष दिले नाही करोडोंच्या संख्येने समाज एकत्र आला विविध आंदोलने झाली पण सरकार मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देत नाहीये,महाराष्ट्रभर आंदोलन दरम्यान झालेल्या केसेस माघे घेत नाही, त्यामुळे मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या मेळाव्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार आहे.
श्री क्षेत्र नारायणगडावर होणारा पारंपरिक दसरा मेळावा मराठा समाजाला नवी दिशा देणारा मेळावा ठरणार आहे त्यामुळे निलंगा तालुक्यातील गावागावातील समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
