महाराष्ट्र महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
निलंगा- येथील महाराष्ट्र महाविद्यालयात शै. वर्ष २०२४-२५ साठीच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅा. माधव कोलपूके, प्राचार्य, म.म. निलंगा हे होते तर उद्घाटक म्हणून एक्सलन्स आयएएस अॅकॅडमी, पुणे चे संचालक श्री कुलदीप कोटंबे हे होते. याप्रसंगी कु. अंजुम शेख हिची वाणिज्य मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून कु. संजना जाधव आणि सचिव म्हणून कु. ममता गुमटे हिची निवड करण्यात आली. वाणिज्य मंडळ पदाधिकारी म्हणून कु. मोहिते प्रतिक्षा, कु. सुर्यवंशी रिंकू, कु. राठोड दिव्या, कु. पेठकर मनोरमा, मुगळे रमन, कांबळे कृष्णा, कु. बिराजदार पूजा, कु. येवते भाग्यश्री आदींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा. नरेश पिनमकर यांनी केले तर शुभेच्छापर मनोगत डॅा. ज्ञानेश्वर चौधरी व डॅा. भास्कर गायकवाड यांनी मांडले. वाणिज्य मंडळाचे उद्घाटक श्री कुलदीप कोटंबे यांनी लोकसेवा परीक्षांची तयारी कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. कोलपूके सरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील संधीची ओळख करून घेण्यावर जोर दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. संदीप सुर्यवंशी यांनी मानले तर सूत्रसंचलन कु. धनश्री हिरास हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. वैभव सुर्यवंशी, प्रा. कु. सपना मोरे, सिद्धेश्वर कुंभार, गणेश वाकळे, प्रकाश सुरवसे व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.
