आशा स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका,मदनिस,प्रेरीका यांचा माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सन्मान
निलंगा:- डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह निलंगा येथे पंचायत समिती निलंगा तालुका अंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका/ मदतनीस प्रेरीका यांचा माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा सपन्न या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे होते.तर प्रमुख उपस्थित उपविभागीय अधिकारी शरद झाडके .
तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान एकेले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव संजय दोरवे,बाळासाहेब शिंगाडे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस / प्रेरीका आदीना प्रमाणपत्र, देऊन गौरवण्यात आले.या प्रसंगी आ.निलंगेकर यांनी कोविड काळातील आशा, अंगणवाडी सेविका यांचे अमूल्य योगदान, लाडक्या बहिण योजनेबाबत चा सक्रिय सहभाग आदींचा आवर्जून उल्लेख करूनसर्व सेविकांना राष्ट्रसेविका अशी उपाधी दिली. तसेच आ.निलंगेकर यानी सर्व उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले
