महाराष्ट्र फार्मसीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
निलंगा:-महाराष्ट्र फार्मसी डी फार्म इन्स्टिट्यूट, निलंगा येथे रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ भागवत पौळ व प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त संकलन अधिकारी डॉ. जयश्री वाघमारे आणि डॉ. सिद्धेश्वर चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमात एचडीएफसी बँक लातूरचे व्यवस्थापक संतोष राऊतराव, पुष्कराज इनामदार, तसेच महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एन. कोलपुके, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील समन्वयक पठाण अमजद, समन्वयक जाधव सिंधू वलोंढे संध्या यांचेही रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी सहकार्य लाभले
शिबिरात डी फार्मसी आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रेड रिबन क्लबचे समन्वयक डॉ. अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख डॉ. सुनील गरड, श्री. परवेज शेख, श्री. विलास कारभारी, डॉ. संजय दुधमल, डॉ. चंद्रकांत ठाकरे, प्राध्यापिका राजश्री मोरे, प्राध्यापिका नंदा भालके, डॉक्टर चंद्रवदन पांचाळ, आणि श्री. विनोद उसनाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
