• Mon. Apr 28th, 2025

काँग्रेसकडून तीन राज्यांत भाजपला झटका; आमदार, माजी मंत्र्यांचा पक्षप्रवेश

Byjantaadmin

Apr 2, 2024

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसने भाजपला जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि झारखंडमध्ये तर उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला आज धक्का दिला. बसपाचे खासदार दानिश अली यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर झारखंडमधील भाजपचे आजी-माजी आमदार, काश्मीरमधील माजी मंत्र्यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसला साथ दिली. राजस्थानमधील भाजपचे नेतेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. बिहारमध्ये माजी खासदार पप्पू यादव यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यामुळे या राज्यात काही भागात काँग्रेसची ताकद वाढली आहे, तर झारखंडमध्ये भाजपचेआमदार जय प्रकाश पटेल आणि माजी आमदार राज पालीवार यांनी भाजपला राम राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जम्मू काश्मीरमधील भाजपचे नेते व माजी मंत्री लालसिंह चौधरी यांनीही बुधवारी काँग्रेसला साथ दिली. 370 चा नारा देणारे या निवडणुकीत पराभूत होतील, असा दावा चौधरी यांनी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर दिला. राजस्थान भाजपचे नेते प्रल्हाद गुंजल यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे समर्थक मानले जातात. त्यांना loksabha निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील नेते खासदार दानिश अली यांनी आजअखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी बसपाने त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे सूतोवाच केले होते.बिहारमध्ये वाढली ताकदबिहारमध्ये पप्पू यादव यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने इंडिया आघाडी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. यादव यांनी २०१५ मध्ये राजदतून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला होता. ते पाच टर्म खासदार होते. त्यांच्या पत्नी सध्या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच दोनदा लोकसभा खासदारही होत्या.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणात बीआरएसला झटका, माजी उपमुख्यमंत्री यांचा मुलीसह काँग्रेसमध्ये प्रवेश

तेलंगणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कदियम श्रीहरी यांनी मुलगी काव्या हिच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार बी मोहन रेड्डी यांनीही काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या तेलंगण प्रभारी दीपा दासमुन्शी यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिकपणे काँग्रेसचे सदस्य घेतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीहरी यांनी बीआरएसच्या तिकिटावर स्टेशन घणपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर, त्यांची मुलगी काव्या हिला आगामी लोकसभा निवडणुकीत वारंगल मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. परंतु, काव्या यांनी बीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed