• Mon. Apr 28th, 2025

धाराशिव लोकसभेसाठी बिराजदार, निलंगेकर, काळेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हे’ नाव चर्चेत

Byjantaadmin

Mar 31, 2024

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 15 दिवस झाल्यानंतर सर्वच पक्षांची जोरदार धामधूम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्चित झाल्यानंतर आता उमेदवार कोण असणार यावरून मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या चेहऱ्याऐवजी अचानक नावाची नाव पुढे आल्याने सर्वांची उत्सुकता वाढली आहे.महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या मतदारसंघातील तिढा सुटला आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबत्त सुरु होती. या जागेचा तिढा शुक्रवारी सुटला. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटली असली तरी आता उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम असून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत आता त्यांच्या विरोधात काळ रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागली आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार यावरून सस्पेन्स कायम असताना त्यातून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव आता चर्चेत आले आहे. यापूर्वी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास सुरेश बिराजदार, विक्रम काळे यांचे नाव चर्चेत होते.शुक्रवारपासून दुसऱ्या पक्षातील उमेदवाराने राष्ट्रवादीत एंट्री केली तर म्हणून अरविंद पाटील-निलंगेकर, माजी आमदार राहुल मोटे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, राहुल मोटे, यांनी शरद पवार गट सोडण्यास नकार दर्शवला. दुसरीकडे सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नावही चर्चेत होते. मात्र, शनिवारपर्यंत कुठल्याच नावावर शिक्कमोर्तब झाला नाही.

त्यानंतर शनिवारपासून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव आता चर्चेत आले आहे. त्यांना शनिवारी मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर एकमत होईल, असे समजते. याबाबत आमदार सतीश चव्हाण यांनी ‘ सरकारनामा’ शी बोलताना सावध प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्टीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगितल्यास सतीश चव्हाण निवडणूक लढवू शकतील, असे समजते.पदवीधर आमदार असलेले सतीश चव्हाण हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील भातागळी या गावचे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed