मोदी सरकारच्या वतीने 2017 मध्ये घेतेलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे, असे परखड प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे आता चर्चा वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.एका खटल्यावर सुनावणी पार पडताना त्यांनी हे विधान केले आहे. न्यायमूर्ती नागरत्न यांनी म्हणाले की, “नोटाबंदी निर्णय घेण्याच्या एक दिवसआधी नव्या चलना विषयी चर्चा सुरु झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. जर आपल्या देशाचा कागदाच्या चलनाकडून प्लॅस्टिक पैसेकडे जाण्याचा उद्देश होता तर, त्यासाठी निश्चितच नोटाबंदी हा पर्याय नव्हता. यामुळे ज्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला तो काही योग्य नव्हता. ही कायदेशीर प्रक्रियेने घेतलेला निर्णय नव्हता. ज्या घाईत हा निर्णय घेतला ते योग्य नव्हतं. काही जणांनी असंही म्हटलं आहे की, या निर्णयाची माहिती खुद्द अर्थमंत्र्यांना नव्हती.हे सर्व पाहता नोटबंदी हा काळ्या पैशांचं पांढऱ्या पैशात रूपांतरीत करण्याता चांगला मार्ग होता. यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यवाहीत नोटबंदीबाबत काय कार्यवाही झाली, याचीही आमच्याकडे कसली माहिती नाही. यामुळे नोटबंदी काळात सामान्य लोकांना झालेल्या त्रासामुळे अस्वस्थ वाटतं. यामुळे मी विवेक नारायण शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात असहमती दर्शवली, असेही न्यायमूर्ती म्हणाल्या.
