• Wed. Apr 30th, 2025

ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही यादीमध्ये समावेश

Byjantaadmin

Mar 30, 2024

: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाचे आपली राजकीय रणनीती आखली आहे. शिवाय निवडणुका म्हटलं की प्रचार हा आलाच. आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करतील अशा चेहऱ्यांना स्टार प्रचारक म्हणून निवडलं जातं. प्रत्येक पक्षाकडून आपापले स्टार प्रचारक जाहीर केले जातात. सध्या शिवसेनाठाकरे गटाने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे.लोकसभा निवडणुकीसाठीआता प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार, संजय राऊत सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांच्यासह 40 जणांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, ती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *