• Thu. May 1st, 2025

अनंत अंबानी यांच्याकडून घेतलेल्या 15 कोटी निधीचं काय केलं?

Byjantaadmin

Mar 30, 2024

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानींकडून तब्बल 15 कोटी रुपयांच्या देणगी घेतल्याचा आरोप विरोधकांनी घेतला होता. यावर बरेच वादंग उठले होते. एका सामाजिक कामासाठी 15 कोटी रुपये घेऊन ते दुसरीकडे वळते केले, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. यावर आता खुद्द कोश्यारी यांनी माध्यमांपुढे येत सारे आरोप फेटाळून लावले आहे.भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो. त्यावेळी माझे शासकीय निवासाचे दरवाजे सामान्य माणसांपासून सर्वांनाच उघडे होते. सुरुवातीपासून मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड बाळगतो. एक दिवस उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानी माझ्याकडे आले. त्यांच्याशी मी चर्चा केली.”कोश्यारी पुढे म्हणाले, “अनंत अंबानींना म्हणालो की, आमची एक अखिल भारतीय विद्या भारती शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था देशभरात वीस हजार शाळांचे संचालन ही संस्था करते. याची एक संस्था नैनीतालमध्ये सरस्वती विहार नावाने कार्यरत आहे. त्याच्या अजूनही दोन-तीन शाखा आहेत. ही संस्था मागील चाळीस वर्षांपासून सुरु आहे. ही संस्था सगळ्या सरकारी कार्यालयात नोंदणी आहे. मी अनंत अंबानींना म्हटलं की, तुम्ही कॅार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलीटीमधून संस्थांना निधी देत असता. मग आमच्या शैक्षणिक संस्थेलाही निधी द्या. मग त्यांनी 15 करोड रुपयांचा निधी दिली.”

“मी त्या शिक्षण संस्थेचा सदस्य आहे, शुभचिंतक आहे. मी त्या संस्थेला हा 15 कोटींचा निधी दिला आहे. अशा प्रकारे निधी कॅार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलीटीमधून घेतले जाते. असंही प्रत्येक आमदार खासदार प्रयत्न करतात की सीएसआरमधून उद्योजकांकडून पैसे मिळावेत. त्यांच्या क्षेत्रातील सामाजिक – शैक्षणिक कामासाठी असे पैसे घेतले जातात. यात काही चुकीचं काम नाही, असेही कोश्यारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *