भाजपाच्या लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या मेळाव्यात गर्दीचा फायदा घेत पाकीटमारांनी अनेक कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे केले. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली latur loksabha निवडणुकीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा लातूर शहरातील भक्ती, शक्ती मंगल कार्यालयात झाला. आमदारramesh karad यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास बहुजन कल्याण विकासमंत्री अतुल सावे, खासदार सुधाकर शृंगारे, दिलीपराव देशमुख, गोविंद केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, बब्रुवान खंदाडे, राहुल केंद्रे उपस्थित होते.लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर, लातूर व औसा तालुक्यातील भादा सर्कलमधील गावातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास मोठी गर्दी केली होती. सभा सुरु होताना, सभेनंतर व भोजनस्थळी मोठी गर्दी झाली होती.या गर्दीचा फायदा घेत पाकीटमारांनी अनेक कार्यकर्त्यांच्या पाकीटावर डल्ला मारला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे झाले. सभा संपल्यानंतर बाहेर येताच याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. त्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले चेहरे घेऊन घराकडे परतले.

मी भाजपाचा बुथप्रमुख असून, माझ्या खिशातील पाकिटात पाच हजार रुपये होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी माझे पाॕकेट पळवले. माझ्याच गावातील अन्य एका कार्यकर्त्यांचेही पाॕकेट मारले गेले.
– सोमनाथ फुलारी, खरोळा