• Wed. Apr 30th, 2025

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) पदाधिकारी व सदस्यांसोबतमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची सुसंवाद बैठक

Byjantaadmin

Mar 30, 2024

मी डॉ. शिवाजी काळगे म्हणून या निवडणुकीत काम करावे

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) पदाधिकारी व सदस्यांसोबत
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची सुसंवाद बैठक

लातुर लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने
वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद
डॉ शिवाजी काळगे यांना लोकसभेच्या दारापर्यंत

नेण्याची जबाबदारी आमची

  • माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख.

latur प्रतिनिधी : महागाई, बेरोजगारीमुळे देशातील जनता बेजार आहे, उदयोग, व्यापार अडचणीत आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. या परिस्थितीत देशातील लोकशाहीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रत्येकाने मी डॉ. शिवाजी काळगे म्हणून या निवडणुकीत काम करावे, असे आवाहन ज लातूर येथे आयोजित डॉक्टरांच्या सुसंवाद बैठकीत बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख केले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर येथे आयोजित वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची व्यापक बैठक शुक्रवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या भारत डाईन हॉल या ठिकाणी सुसंवाद बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा लातुरच्या पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की. डॉ शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच ठिकाणी त्यांच्या उमेदवारी चे स्वागत होत आहे आणि हे सर्व त्यांचा स्वभाव, त्यांच्यावर असलेले जनतेचं प्रेम यामुळे शक्य झाले.देशाचे स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी या लोकशाही च्या उत्सवात सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे लागेल आपल्याला व्यक्त व्हावे लागेल कारण गेल्या १० वर्षात राज्यात आणि देशातील परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे हे लक्षात घेता आजची
परिस्थिती बदलून पुन्हा आपला महाराष्ट्र आपला देश पूर्वी सारखा व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पूढे बोलतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था अबाधित राखून प्रगतीच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या,सुशिक्षित सुसंस्कृत लोकांनी राजकारणात येणे आवश्यक आहे आणि व्यापक दृष्टी असलेल्या उमेदवारांना
मतदारांनी आशीर्वाद देणेही गरजेचे आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी २५ वर्ष रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
मानून जनसेवा केली,लक्ष्मी नेत्र रुग्णालयात आजवर काही चुकीचे झाले नाही, रुग्णांच्या मनातील विश्वास,प्रेम, आपुलकीचे फलित म्हणजे डॉ शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर झाली असून अनेकांना शंका कुशंका असून डॉ शिवाजी
काळगे यांना दिल्लीतील लोकसभेच्या दारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे असे म्हणत उपस्थिताना आश्वस्त केले. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, पुणे, मुंबई पेक्षा जर लातूरचे आधीक विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर मग लातूरला गुणवत्तेच्या निकषावर एम्स व्हायला हवे आणि त्यासाठी डॉ.
शिवाजी काळगे यांना निवडून देऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हणत आपल्या कामकाजाला सांभाळून आपण पुढील प्रचार आणखी चांगला कसा असेल यावर चर्चा करून नियोजन केले जाईल आपण सर्वांनी खंबीरपणे डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख
म्हणाले की, लोकशाहीत आपन कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे,
प्रत्येकाला मिळणारे अधिकार हे समान आहेत आणि हे सर्व आपल्या राज्य
घटनेमुळे आपल्या देशातील लोकशाहीमुळे पण आज देशातील परिस्थिती पाहता
लोकशाही अस्तित्वात आहे की नाही असाच प्रश्न आपल्या मनात येतो. आज
देशातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आपला लोकप्रतिनिधी
म्हणून डॉ शिवाजी काळगे यांना संसदेच्या नवीन इमारती मध्ये पाठवावे
लागेल.आजची व्यवस्था बदलण्यासाठी आणि जी आपल्या महापुरुशाणी निर्माण
केली होती ती परत आणण्यासाठी आपल्याला धाडस करावे लागेल अन्यथा
आपल्याला आपली येणारी पिढी माफ करणार नाही याचा विचार आज आपण
करावा लागेल.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील मुळ तत्व काय आहे तर
आपला रुग्ण वाचला पाहिजे त्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातात असेच
प्रयत्न आपल्याला करावे लागतील लातूरला देखील एम्स झाले पाहिजे, वैद्यकीय
क्षेत्रातील नवनवीन प्रकल्प लातुर मध्ये यायला हवेत यासाठी काळाची गरज
ओळखून आणि आपल्या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी येणाऱ्या ७ मे रोजी
आपण डॉ.शिवाजी काळगे यांना मत देऊन प्रचंड मताधिक्याने लोकसभेत
पाठवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी जे विचार दिले त्या
विचाराने राजकारनात आम्ही सरळ चालत आहोत आम्ही ट्रॅक सोडणार नाही
आमची चाल ही हत्ती सारखी सरळ असून जे येतील त्यांना घेऊन जे येणार
नाहीत त्यांना सोडून हे ब्रीद घेऊन आपण कमला लागावे असेही आवाहन त्यांनी
केले.
यावेळी बोलताना डॉ शिवाजी काळगे म्हणाले की, सण २०१४ आणि २०१९
असे दोन वेळा प्रयत्न केले पण जे जमले नाही ते आज २०२४ लोकसभा
निवडणूक निमित्ताने जमले ते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्यामुळे आणि आज या ठिकाणी जमलेले माझे बांधव व भगिनींचे प्रेम

मिळाले हेच मी माझे भाग्य समजतो.सद्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता
आपल्या सारख्याने राजकारणात जाणे मला योग्य वाटत नव्हते पण माजी मंत्री
आमदार अमित देशमुख आणि माझे कुटुंबिय,मित्र परिवार यांच्या पाठिंब्यामुळे
मी धाडस केले आहे.आपण दिलेल्या प्रेमाच्या जोरावर आपण नक्की यशस्वी
होऊ असा विश्वास व्यक्त करीत अशीच खंबीर साथ कायम द्यावी असे आवाहन
त्यांनी उपस्थिताना केले.
प्रास्ताविक करताना डॉ.कल्याण बरमदे म्हणाले की, आपल्या वैद्यकीय
क्षेत्रातील एक सहकारी लातुर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातुर लोकसभा
मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून आपल्याला मिळालेले आहेत ते स्वच्छ प्रतिमेचे
डॉ.शिवाजी काळगे यांच्या रुपात जनसेवेसाठी एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व
असलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून आणण्याचा
निर्धार करावा असे म्हणत डॉ. शिवाजी काळगे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ.अशोक आरदवाड म्हणाले की,डॉ.शिवाजी काळगे हे
रुग्णप्रिय तर आहेतच शिवाय डॉक्टर प्रेमी सुद्धा आहेत. आजच्या बैठकीसाठी
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले हे प्रथमच
घडले.आमच्यात वेगवेगळ्या विचारधारा आहेत पण या निवडणुकीत आपल्या
क्षेत्रातील लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून महाविकास आघाडी नेतृत्वाने दिला
त्याबद्दल आभार मानतो डॉक्टर लोकांना पक्ष नसतो परंतु लातूरच्या डॉक्टर
मंडळींचा पक्ष आहे तो म्हणजे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख,सहकार
महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख आहेत हे आवर्जून सांगितले. पुढे बोलताना
ते म्हणाले की,आजवर आपण रुग्णांना फिस मागत असू पण आता आपल्या
मित्रासाठी आपल्या रुग्णाकडून एक मताचा हात मागावा आणि डॉ.शिवाजी
काळगे यांना लातूरचा खासदार म्हणून दिल्लीत पाठवावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ.अजय जाधव म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या
निमित्ताने लातुर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे
उमेदवार म्हणून डॉ शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली याबद्दल पक्ष श्रेष्ठी
आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानतो. ही
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लातूरच्या सर्वच क्षेत्रात आनंद आणि उमेदवारीचे
स्वागत केले जात आहे प्रत्येक लातुर वासीयात उत्साह वाढला आहे आणि हाच

उत्साह हाच प्रतिसाद ७ मे पर्यंत आपण कायम ठेवून मी स्वतः डॉ.शिवाजी
काळगे आहे असे मानून कमला लागावे असे आवाहन उपस्थित वैद्यकीय
क्षेत्रातील मान्यवरांना केले.
यावेळी बोलताना डॉ. संतोष कावठाळे म्हणाले की,डॉ.शिवाजी काळगे हे
एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व तर आहेच शिवाय शांत,संयमी एकमेवाद्वितीय
उदाहरण होय यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका व्यक्त केली जाऊ
शकत नाही. यामुळे आपल्याला डॉ.शिवाजी काळगे यांना निवडुन देत काँग्रेस
पक्षाला साथ द्यावी कारण गेल्या काही वर्षांत आपण पाहतो आहे की देशात
आज एक प्रकारची आणीबाणी निर्माण झाली असून यातून आजच्या आभासी
जगातून आपल्याला बाहेर पडायचे असेल फक्त आणि फक्त महाविकास आघाडी
काँग्रेस सत्तेत येणे आवश्यक आहे असे म्हणत डॉ.शिवाजी काळगे याना
बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ.अनुजा कुलकर्णी म्हणाल्या की,आपण सर्वजण डॉ
शिवाजी काळगे यांना जाणतो,मानतो,त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल तर शंकाच
आपण व्यक्त करू शकत नाही असे सर्वांच्या अडीअडचणी समजून घेणारे ते
आहेत.आणि ते आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समस्या सोडवण्यासाठी
कटिबद्ध राहतील असे म्हणत त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना डॉ.स्वाती गोरे म्हणाल्या की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पक्ष स्वतंत्र पूर्व काळा पासून असून आज आपण सर्वजण या पक्षाला ओळखतो
या पक्षाचे योगदान आणि या पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना निवडुन
द्यावे अशी विनंती केली
यावेळी बोलताना डॉ.सुनीता पाटील म्हणाल्या की, देशाचं उज्वल भविष्य
घडविण्यासाठी आपल्याला आता पुढे यावे लागेल आणि यासाठी आपण
अंधारातील प्रकाशाची ज्योत म्हणून डॉ.शिवाजी काळगे यांना पाठिंबा देत त्यांना
निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना डॉ शांतीलाल शहा म्हणाले की,. डॉ.शिवाजी काळगे हे
आपले प्रतिनिधी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आपण
सर्वांनी एक कुटुंब म्हणून डॉ शिवाजी काळगे आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे
राहू असा संकल्प या ठिकाणी करावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना डॉ. बालाजी साळुंके म्हणाले की, डॉ शिवाजी काळगे
यांच्या रूपाने आपल्या लातुर मतदार संघात उमेदवार देऊन माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असून ऐका दगडात दोन
शिकार केल्या आहेत ज्यामुळे विरोधकांना यापुढे करावे काय हेच समजत नाही.
आजची ही बैठक आणि मिळालेला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीचा प्रतिसाद पाहता
डॉ.शिवाजी काळगे यांचा विजय निश्चित आहे.
यावेळी बोलताना डॉ.आनंद पवार म्हणाले की, लोकसभा
निवडणूकित विरोधी पक्ष म्हणतात उमेदवार पाहू नका केंद्रात असलेले नेतृत्व
पाहावे पण गेली कांही वर्ष पाहता आता वेळ आली की उमेदवार कसा आहे ते
पाहून मतदान करण्याची म्हणून या संधीचा आपण फायदा घ्यावा आणि या
नामी संधीचे सोने करावे व डॉ.शिवाजी काळगे याना निवडून द्यावे असे आवाहन
केले.
यावेळी बोलताना डॉ.दिनेश नवगिरे म्हणाले की, आजचे राज्यातील आणि
देशातील राजकारण आपन सर्वजण पाहतोय पण आशा राजकारणाला लातुर
अपवाद आहे कारण येथिल नेतृत्व सुसंस्कृत आहे. आज आपण लोकसभा
निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे हे
सुसंस्कृत, उच्च शिक्षित, संयमी,मितभाषी असल्याने यावेळी होत असलेली
निवडणूक ही विज्ञान विरुद्ध अज्ञान अशी होत असून आपण सर्वांनी अज्ञाना
ऐवजी विज्ञानाला साथ द्यावी आणि योग्य ठिकाणी योग्य उमेदवार आपण
द्यावा लागेल तो म्हणजे डॉ शिवाजी काळगे असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी
करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. हुक्कीरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे बिगुल
वाजल्यास असे वाटले की आपल्या गटाचाही उमेदवार असावा जो आपल्या
समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करेल आणि हे सत्यात उतरले माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यामुळे आणि आपल्याला डॉ शिवाजी
काळगे हे लातुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून आपल्याला मिळाले
असून आपल्या हाताने दुसरीकडे मतदान न करता आणि आपला हात न सोडता
डॉ शिवाजी काळगे यांना मताचे दान द्यावे असे आवाहन केले.

यावेळी बोलताना डॉ.पृथ्वीराज चौहान म्हणाले की, आजची बिघडलेली
राजकीय परिस्थिती सुधारन्यासाठी चांगला उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे
असे म्हणत डॉ शिवाजी काळगे याना साथ देण्याची विनंती केली.शेवटी उपस्थित
सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे आभार डॉ अशोक पोद्दार यांनी मानले.
यावेळी लातुर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज विलासराव देशमुख,
डॉ.शिवाजी काळगे,ऍड.समद पटेल, डॉ. कल्याण बरमदे,डॉ.अभय कदम,डॉ.सतीश
देशमुख,डॉ.संजय वारद,डॉ.संजय पौळ,डॉ.संतोष कवठाळे, डॉ.अशोक पोतदार,
डॉ.उत्तम देशपांडे, डॉ.महेश सांडूर,डॉ. पुरुषोत्तम दरक, डॉ.विनोद कोराळे, डॉ कोरे,
डॉ सतीश बिराजदार, डॉ सारडा यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA),
निमा,चे लातुर शाखा पदाधिकारी,सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या
संख्येने उपस्थित होते. आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेल्या
लातूर मधील डॉक्टर मंडळी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होती. आपला
व्यवसाय सांभाळून डॉ.शिवाजी काळगे यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण
परिश्रम घेऊन अशी ग्वाही याप्रसंगी उपस्थित सर्व डॉक्टर मंडळींनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *