माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व उमरगा तालुका काँग्रेस कमिटी
शिष्टमंडळाने घेतली भेट विविध विषयावर केली चर्चा
प्रतिनिधी : सोमवार दि. २५ मार्च २०२४
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांची सोमवार दि. २५ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व उमरगा तालुका
काँग्रेस कमिटी शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, युवा नेते अशलेष मोरे, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष राजुळे,
विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, नितीन कोराळे, विशाल काणेकर, बलभीम पाटील, मधुकर यादव, गिरीष पाटील, संजय चालुक्य, विकास हाराळकर, दिलीप सगरे, महेश देशमुख, महेश जाधव आदीसह धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत. देशात राज्यात
धाराशिव जिल्ह्यात जी उलथापालथ झाली त्याचे पडसाद आज मला येथे दिसतात, मी अनेकांचे मनोगत ऐकले मोकळा श्वास
काय असतो हे अनेकांना जाणवले. आमचे पदाधिकारी तुमच्या संपर्कात आहेत, देशातील सार्वत्रिक निवडणुकीत आपणाला एक विचार स्वीकारण्याची आता वेळ आलेली आहे, देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी निवडणुका लढवत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी स्नेही ओमराजे निंबाळकर उभे आहेत आपणाला अगोदर महाविकास आघाडीचा आघाडी धर्म पाळा वयाचा आहे, आणि विजयश्री खेचून आणायचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे उमरग्याचे जावई आहेत, लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या काळापासून लातूर उमरगाचे ऋणानुबंध आहेत. महाविकास आघाडीचा झेंडा राज्यातील लोकसभेच्या जागेवर फडकला पाहिजे. अशलेष मोरे यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे, समाजाशी नाळ जोडलेला हा कार्यकर्ता आहे त्यांना पाठबळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळेल सर्वांनी धाराशिव व लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या कामाला लागावे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राज्यात सध्या जे चालू आहे ते मावळणार आहे व नवी पहाट येणार आहे. त्या नव्या पहाटेचे साक्षीदार आपण होणार आहोत. आपणाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे, आपली मातीशी नाळ जुळलेली आहे,
जे मातीला बेईमान झाले ते निघून गेले ज्यांनी इमान राखले ते आज येथे आहेत. सर्वांच्या खांद्याला खांदा लावून मी
तुमच्यासोबत उभा आहे अशी ग्वाही देऊन त्यांनी सर्वांना देऊन भविष्यातील कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, युवा नेते अशलेष मोरे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील
नेते भाजपात गेले पण काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते जागीच आहेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
धाराशिव जिल्हा व उमरगा लोहारा तालुक्याच्या पाठीशी राहावे असे मनोगत व्यक्त केले शेवटी बैठकीचे आभार गिरीश पाटील
यांनी मानले.
