माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघातील २७ गावातील बुथ प्रमुखांची घेतली बैठक
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या केल्या सूचना
प्रतिनिधी :लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे यांना अधिकृत उमेदवारी
मिळाली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर
मतदारसंघातील बाभळगाव, महापूर, हनमंतवाडी, कातपुर, गंगापूर, वासनगाव पाखर सांगवी, शिरसी आदी सत्तावीस
गावातील बूथ प्रमुखांची बैठक घेऊन लातूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या कामाला लागावे, अशा सूचना
केल्या आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन
समद पटेल, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, सचिन बंडापल्ले, गणेश एसआर देशमुख, तानाजी फुटाणे
पंडित ढमाले, रघुनाथ शिंदे, डॉ. सतीश कानडे, गोविंद देशमुख, प्रताप पाटील संजय निलेगावकर आदीसह काँग्रेस पक्षाचे
विविध पदाधिकारी लातूर शहर मतदार संघातील २७ गावातील विविध पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर
खानापुरे यांनी बुथ प्रमुखांना दिलेल्या सर्व सूचना अमलात आणाव्यात असे सांगून बुथनिहाय कामाचे नियोजन
करण्याच्या सुचना दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की ही निवडणूक म्हणजे वैचारिक युद्ध आहे हे विचारानेच लढावे
लागेल, डोअर टू डोअर कॅम्पेन दोन वेळा करावे ते करताना पहिल्या टप्प्यात जाहीरनामा, उमेदवाराचा परिचय पत्र
मतदारांना द्याव, दुसऱ्या टप्प्यात पोलचिट द्यावी. लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे लोक आग्रहातून
सुसंस्कृत सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकसभा नंतर विधानसभा
त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या क्षणापासून प्रत्येकाने कामाला लागावे प्रत्येकाने
प्रचारासाठी मेहनत घ्यावी लढून आपल्याला जिंकायचे आहे. देशात राज्यात जिल्ह्यातील मुद्द्यावर लोकसभा
निवडणुका होतील, पण काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मतदारांच्या दारापर्यंत जावे लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी
योग्य व्यक्ती लोकसभेत गेली पाहिजे असे सांगून त्यांना सर्व बूथप्रमुखांना पुढील कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे म्हणाले की, गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत
ज्याप्रमाणे आपण नियोजन करतो त्याप्रमाणे नियोजन लोकसभा निवडणुकीत बूथप्रमुखांनी करावे या निवडणुकीचे
व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यावेळी डॉ.सतीश कानडे, विलासराव देशमुख युवा मंचचे लातूर शहराध्यक्ष विजय
टाकेकर, माजी नगरसेवक आसिफ बागवान यांनी मनोगत व्यक्त केले, तर या बैठकीचे शेवटी आभार लातूर तालुका
काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी मानले.
