मुंबई : लोकसभा निवडणुकीत(BJP candidate List) करण्यामध्ये आघाडी घेतल्याचं दिसत आहे. भाजपने देशभरातील उमेदवारांच्या (BJP list) पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 23 उमेदवारांची (BJP Maharashtra list) घोषणा आतापर्यंत भाजपने केली आहे. महाराष्ट्रात भाजपप्रणित महायुतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार हा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. मात्र ज्या जागा मागील निवडणुकीत ज्या पक्षाने जिंकल्या आहेत, त्या पक्षाला त्या त्या जागा मिळतील असं साधारण गणित सुरुवातीपासून सांगितलं जात आहे. पण जसजशी भाजपची उमेदवार यादी जाहीर होत आहेत, त्यानुसार EKNATH SHINDE यांच्या शिवसेनेच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागांची आदलाबदली होण्याची शक्यता आहे.

भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे पूनम महाजन यांच्या जागेवर भाजप दुसरा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपने मागील निवडणुकीत 23 जागा जिंकल्या होत्या. भाजपने पूनम महाजन यांची जागा वगळता 23 उमेदवार जाहीर केले आहेत. मागील निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा
आतापर्यंत पाच विद्यमान खासदारांची तिकीटं कापली
भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची जी यादी जाहीर केली आहे, त्यानुसार आतापर्यंत पाच विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत. यामधील सर्वात मोठी नावं म्हणजे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं आहे. याशिवाय मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक आणि जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट भाजपने कापलं आहे.
तिकीट कापलेल्या जागांवर कुणाला उमदेवारी?
- उत्तर मुंबई लोकसभा (Mumbai North): गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियूष गोयल (Piyush Goyal)
- मुंबई उत्तर पूर्व (Mumbai North East) : मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्याऐवजी मिहीर कोटेचा (Mihir Kotecha)
- बीड लोकसभा (Beed Lok Sabha) : प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे (Pankaja Munde)
- जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha): उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्याऐवजी स्मिता वाघ (Smita Wagh)
- सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) : जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुते (Ram Satpute) यांना तिकीट
आतापर्यंत जाहीर झालेले भाजप उमदेवार
१) CHANDRAPUR – सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४)BEED – पंकजा मुंडे
५) PUNE- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) LATUR- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) SOLAPUR – राम सातपुते
२२) भंडारा GONDIYA – सुनील मेंढे
23) GADCHIROLI चिमूर – अशोक नेते
राज्यात आतापर्यंत जाहीर झालेले उमदेवार
- भाजप – 23
- काँग्रेस – 12
- ठाकरे गट –
- शिंदे शिवसेना –
- राष्ट्रवादी अजित पवार –
- शरद पवार गट –
- MIM- 1
- VBA-