• Wed. May 14th, 2025

लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण अमित शाहांची भेट मिळालीच नाही

Byjantaadmin

Mar 22, 2024

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. भाजपकडून काही दिवसांपूर्वीच maharashtraतील 20 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, भाजपकडून या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. यानंतर उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी दिल्लीकडे धाव घेतली होती. परंतु, आता दोन दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतच अडकून पडावे लागले आहे. 

उदयनराजे भोसले यांना दिल्लीत अमित शाह यांची भेट घ्यायची होती. आज-उद्या अमित शाहांची भेट मिळेल, असे उदयनराजे यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे उदयनराजे भोसले दिल्लीत थांबून आहेत. शुक्रवारी  उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांची भेट मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु, ही भेटदेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडण्याची शक्यता आहे. 

फडणवीसांच्या भेटीनंतरही उदयनराजे अस्वस्थ

उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी महायुतीतूनच विरोध असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र, काही आठवड्यांमध्येच खासदारकीचा राजीनामा देत ते भाजपवासी झाले होते. परंतु, satara लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या एका सभेमुळे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला होता. हा इतिहास बघता महायुतीमधून उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सागर बंगल्यावर जाऊनdevendra fadnvis यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत उदयनराजे यांची नाराजी दूर न झाल्याने त्यांनी बुधवारी रात्रीच दिल्ली गाठली होती. उदयनराजे भोसले यांना दिल्लीत अमित शाह यांच्याशी वन टू वन चर्चा करायची आहे. परंतु, अद्याप अमित शाह यांनी उदयनराजे भोसले यांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *