मुंबई : नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारं सिनेसृष्टीतील नाव म्हणजे,गोविंदा आता अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा गोविंदा (2024) रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील ) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या अनुशंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगानं अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.
गोविंदानं याआधीही 2004 मध्ये लोकसभा लढवलीय
याआधी गोविंदानं 2004 मध्ये उत्तरmumbaiतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला भगदाड पाडलं होतं. गोविंदानं भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा रोवला होता. अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध असून राजकिय डावपेच याचीही जाण असल्याने अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा चेहरा चालू शकतो का? ठाकरेंकडून रिंगणात उतरलेला उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकरांना गोविंदा शह देणार का? या सर्व अनुशंगानं चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यापूर्वी या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षीत, नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय कुमार आणि नाना पाटेकरांनी राजकारणात येण्यात स्पष्ट नकार दिला. तर, माधुरी दिक्षीत यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गोविंदाला उमेदवारी देण्याच्या पर्यायाची चाचपणी शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.