• Wed. May 14th, 2025

माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार, शरद पवारांची 9 जणांची संभाव्य यादी

Byjantaadmin

Mar 22, 2024

(Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी  पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावं दिली आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची (Madha Lok Sabha) जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. याशिवाय पहिल्या 9 जणांची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यामध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.  

बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर तिकडे शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात. 

जागा आणि संभाव्य उमेदवार 

बारामती-सुप्रिया सुळे 

माढा-महादेव जानकर(रासप) 

SATARA-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील 

शिरुर-अमोल कोल्हे

नगर दक्षिण-निलेश लंके 

BEED-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे 

VARDHA -अमर काळे 

दिंडोरी- 

रावेर –  

महाविकास आघाडीत कुणाला किती जागा? 

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कुणाला किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. विविध फॉर्म्युले समोर येत आहेत, पण तिन्ही पक्षांकडून अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. त्याआधीच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपआपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सात जणांची पहिली यादी कालच जाहीर केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *