• Tue. May 13th, 2025

सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Byjantaadmin

Mar 20, 2024

औंध : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माने यांनी आज सकाळी मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप,पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अनुभवी नेतृत्वातच महाराष्ट्राचा आणि पुणे शहराच्या शाश्वत विकास होऊ शकतो ही माझी धारणा असल्याने मी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सुनील माने यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

सामाजिक, राजकीय, पत्रकारितेतील माझ्या अनुभवाचा पुणे शहर आणि राज्याच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले. माने यांच्यासह माजी नगरसेवक आरिफ बागवान, माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *